तुळजापूर वरून देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या कार व एसटी बस चा भीषण अपघातात, पाच जणांचा मृत्यू,तर एक जण गंभीर,भाविकावर काळाचा घाला…
MB-NEWS (उदगीर) : -उदगीरहुन चाकुरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहुन उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर नळेगाव रस्त्यावरील हैबतपुर पाटीच्या पुढे सकाळी साडेआठ वाजता भीषण अपघात झाला.या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.
बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान कार मधील मयत पाच जण उदगीर येथील एका खाजगी रुग्णालयात कामाला होते.
उदगीर आगाराची बस क्रमांक एम एच २० बीपी १३७५ बसला सकाळी सव्वा आठ वाजता चाकुर कडे रवाना झाली. दरम्यान बस हैबतपुर पाठीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीर कडे येणारी कार क्रमांक का एम एच २४ एबी ०४०८ बसला समोरून धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाच जण जाग्यावरच ठार झाले तर बसमधील दहा जण जखमी झाले असून त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदत कार्य केले. या अपघातात मयत आलोक तानाजी खेडकर राहणार संत कबीर नगर उदगीर, जीवनराव देवकते राहणार रावणकोळा, कोमल व्यंकट गोदरे राहणार तोरणमाळ तालुका मुखेड, यशोमती जयवंत देशमुख राहणार यवतमाळ, नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार राहणार बिदर रोड उदगीर,हे जागीच ठार झाले तर प्रियंका गजानन बनसोडे राहणार येरोळ हल्ली मुक्काम गोपाळ नगर उदगीर, ही गंभीर जखमी झाली आहे.

