Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

वाचा MB-NEWS वर BIG BREAKING NEWS 06/10/22

वाचा MB-NEWS वर BIG BREAKING NEWS 06/10/22

▪️मुकेश अंबानी आणि नीता अंबानींना जीवे मारण्याची धमकी, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये अज्ञात व्यक्तीचा धमकीचा फोन, पोलिसांकडून तपास सुरु

▪️जबाबदारी दिली ते कटप्पा निघाले, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात, मविआ सरकारमध्ये शपथ घेताना गप्प का राहिलात? शिंदेंना सवाल तर भाजपवरही निशाणा

▪️एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप, आनंद दिघेंचे पाय कापणारे हेच, दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंकडून संपत्तीबाबत चौकशी, शिंदेंचा आरोप

▪️मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्यात जयदेव, स्मिता आणि निहार ठाकरे यांचा सहभाग, एकनाथला एकटं पाडू नका, जयदेव ठाकरेंचं आवाहन, निहार आणि स्मिता ठाकरेंनाही व्यासपीठावर मानाची खुर्ची

▪️काहींची भाषण नको इतकी लांबली, अजित पवार यांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

▪️शिंदेंच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात 9 ऑक्टोबरला ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा, उद्धव ठाकरे मात्र सहभागी होणार नाहीत

▪️काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आज सोनिया गांधी सहभागी होणार, दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती

▪️साईबाबांचा चार दिवसांचा पुण्यतिथी उत्सव सुरु, शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी

▪️आज संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता

▪️हरियाणात रावणाचा जळता पुतळा नागरिकांच्या अंगावर कोसळला, अपघातात काही नागरिक जखमी, यमुनानगर येथील रावण दहनावेळी दुर्घटना

▪️शेअर बाजारात खरेदीचे संकेत; सेन्सेक्स 392 अंकांनी वधारला

▪️पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना; अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरुच

▪️किडनी दुखापत आणि गॅम्बियामधील 66 मुलांचा मृत्यू, भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध WHO कडून अलर्ट जारी

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे