Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

होमगार्ड निघाला दुचाकी चोरटा,कोतवाली पोलिसांची कार्रवाई…..

होमगार्ड निघाला दुचाकी चोरटा,कोतवाली पोलिसांची कार्रवाई…..

अमरावती  (प्रतिनिधी):-सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत गांधी चौक परिसरात फ्रेजरपूरा रहिवासी सुनिल बागडे नावाच्या होमगार्डची नवरात्री दरम्यान सुरक्षेकरिता डयुटी लावली होती. या दरम्यान गांधी चौकातून एक दुचाकी चोरी झाली होती. त्याची तक्रार कोतवाली पोलिसात करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. परंतु चौकशी दरम्यान एका होमगार्डला अटक करुन चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. सुशिल कमलाकर बागडे (२९ फ्रेजरपुरा) असे दुचाकी चोरटा होमगार्डचे नांव आहे. सविस्तर असे की, काही दिवसांपूर्वी गांधी चौक परिसरातून

दुचाकी क्रमांक एमएच २७ / एजी-८९४२ ची चोरी करण्यात आली होती. याबाबत सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता. या बाबत सखोल चौकशी करण्यात आली असता डीबी स्कॉडच्या हाती चोरीचे काही पुरावे हाती लागले. लोकांच्या सुरक्षेकरिता तैनात करण्यात आलेल्या होमगार्ड सुशिल बागडे ला त्यांनी पकडले. आरोपी सुशिल ने दुचाकी चोरण्याचा गुन्हा कबुल केला आहे, त्याच्यापासून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे, पोलिस सुशिल बागडे विरुध्द पुढील कारवाई करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे