स्टील तब्ब्ल प्रतिटन 15,000 रुपयानी स्वस्त…. बांधकाम खर्च कमी होण्याची शक्यता आहे.

स्टील तब्ब्ल प्रतिटन 15,000 रुपयानी स्वस्त…. बांधकाम खर्च कमी होण्याची शक्यता आहे.

MB-NEWS :-(दिल्ली)गेल्या एक-दोन महिन्यांपासून पोलाद उद्योगाने उत्पादन कमी केले आहे. बांधकाम क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडून मागणी वसूल व्हावी आणि दिवाळीच्या सुमारास स्टीलची मागणी वाढेल, अशी अपेक्षा स्टील उद्योजक व्यक्त करीत आहेत, असे स्टील समूहाचे सहसंचालक नितीन काबरा यांनी सांगितले,केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे भारताचा निर्यातीतील वाटा कमी झाला आहे – मागणी वाढावी अनेक उद्योजकांनी आपले उत्पादन कमी केले आहे – असेही नितीन काबरा यांनी म्हटले आहे.दरम्यान आता बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात प्रतिटन 15 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आता बांधकाम खर्च कमी होण्याची शक्यता आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे