राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; 14 ऑक्टोबरपर्यंत कडाडणार अन् गडगडणारही

राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; 14 ऑक्टोबरपर्यंत कडाडणार अन् गडगडणार ची शक्यता?

         MB-NEWS (पुणे):- मुंबईसह राज्याला ऑक्टोबर महिन्यातही झोडपून काढलेल्या पावसाने रविवारी सुटी घेतली तरी १४ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

       परतीचा पाऊस अद्यापही राज्यात दाखल झालेला नाही. तो गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याला लेटमार्क लागला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादसह विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, इतर जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे