चिखलदरा तालुक्यातील काजलडोह गावात लक्ष्मी विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न…..
MB-NEWSअक्षय अथोटे (मेळघाट चिखलदरा,प्रतिनिधी):-
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काजलडोह गावात गावातील लोकांनी आदिवासी लोक नृत्य करून लक्ष्मी विसर्जन केले. गावातील लोकांचे बोलणे असे आले की लक्ष्मी विसर्जन उत्सव साजरा केला जातो. व लक्ष्मी विसर्जन उत्सवं दरम्यान लोक वर्गणी तुन एखाद्या कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रम मध्ये गावातील सर्वा गवकरी मंडळी राहतो गावातील लोकांना खर्च वेगळा येतो. व लक्ष्मी ला निरोप पण देते आणि काजलडोह येथील सार्वजनिक लक्ष्मी मंडळांची मिरवणुक शांततेत काजलडोह काही दिवस पाहुणे म्हणून आलेली लक्ष्मी भक्तिभावाने सेवा केल्यानंतर लक्ष्मी ला निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी लवकर या’ हे सांगायला मात्र, भक्तांचा ऊर दाटून आल्याचे दिसले. कुठे ढोल ताशांचा निनाद, तर कुठे बायन्ड पार्टी आणतात याचा खर्च वेगळा गावकरी मंडळीना बसतो गुलालाची उधळण करत लक्ष्मी ला वाजत गाजत निरोप दिला जातो भक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांना बघता बघता काही दिवस कसे निघून गेले कळालेच नाही. लक्ष्मीला निरोप देताना, निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवी, माफी असावी अशाच भावना भक्तांच्या होत्या तर यावेळी एवढेच नाही तर इथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गावातली मंडळी यांनी महाप्रसादाचा आयोजन केलं जातो याचा खर्च वेगळा गवकारी मंडळी यांना बसतो अशातच काजलडोह गाववाशी यांनी या वर्षी गावातील लक्ष्मी विसर्जन आदिवासी लोक नृत्य करून लक्ष्मी विसर्जन केले. गावातील लोकांचे बोलणे असे आले आहे. की आदिवासी लोक नृत्य हे आमची संस्कृती आहे. लक्ष्मी विसर्जन करताना आम्ही सर्वांनी आमची संस्कृती जतन केली व वायफळ खर्च टाळला. आम्ही सर्व गावावाशी सर्वांना सांगू इच्छितो की, कोणतेही सणासुदी मध्ये वायफळ खर्च टाळावा व एक दम साधे प्रकारे सन साजरे करा. काजलडोह गाववाशी यांचे मत आहे. व काजलडोह गावाशी यांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला.

