Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आता थकीत वीजबिलापोटी शेतातले वीज कनेक्शन कट होणार नाही; महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे आदेश…

आता थकीत वीजबिलापोटी शेतातले वीज कनेक्शन कट होणार नाही; महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे आदेश…

MB-NEWS (मुंबई) :-आधीच आस्मानी-सुलतानी संकटांनी भांबावलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयोगाने शेतकऱ्यांसाठी मोठा निकाल दिला आहे. त्यानुसार, थकीत वीजबिलापोटी आता कोणत्याही शेतकऱ्याची वीज आता महावितरणला कापता येणार नाही. आयोगाने महावितरणला तसा सूचना वजा आदेशच दिला आहे.

▪️ थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. त्याविरोधात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सचिन धांडे यांनी महावितरणविरोधात (MSEB) अन्नसुरक्षा आयोगात याचिका दाखल केली होती. त्यावर आयोगाने नुकताच निकाल दिला.

▪️ गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यात कृषिपंपाची वीज कापली गेल्यास शेतकऱ्यांना रब्बी पिकेही घेणं मुश्किल होणार आहे..

▪️ त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी असताना, कुठल्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेशच अन्न सुरक्षा आयोगाने महावितरणला दिलाय. *शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर आपण काय खाणार?* त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा व्हायला हवा. अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे.

▪️ असा दृष्टिकोन ठेवत राज्य अन्नसुरक्षा आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिल्याने महावितरणाला आता शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापता येणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे