भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,तिवसा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने भव्य धरणे आंदोलन व निदर्शने…
MB-NEWS (सुनील घोडमारे, तालुका प्रतिनिधी):- तिवसा तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व वरखेड मंडळातील वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भव्य धरणे आंदोलन व निदर्शने..
तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन,तुर,कापूस,संत्रा या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.आधीच हवालदिल शेतकऱ्यांना भाजप प्रणित शिंदे – फडणवीस सरकारने ओला दुष्काळ जाहीर न करता किरकोळ मदत देऊन हात वरती केले आहे.तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळातील २५ गावातील हजारो शेतकरी या शासनाच्या बेजबाबदारपणामुळे ऐन दिवाळीत वंचित राहिले आहेत.
यासर्व मागण्यासह तिवसा तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने भव्य धरणे,निदर्शने व निषेध आंदोलन तिवसा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ येथे गुरुवार दिनांक ०३/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता पेट्रोल पंप चौक,तिवसा येथे करण्यात येणार आहे तरी आपण सर्व शेतकरी बांधवासह उपस्थित राहावे ही विनंती..

