‘ग्रामपंचायत विकास आराखड्यातंर्गत साधला जाऊ शकतो ग्रामविकास’ -: मिना म्हसतकर
गणस्तरीय कार्यशाळेत सात ग्रामपंचायत चे सरपंच,सदस्य, कर्मचारी यांची उपस्थिती; मालखेड येथे पार पडली एक दिवसीय कार्यशाळा
MB-NEWS (चांदुर रेल्वे) :- तालुक्यातील मालखेड याठिकाणी असलेल्या श्री अंबादेवी देवस्थान सभागृहात ग्रामपंचायत विकास आराखडा 2023- 2024 हा कसा तयार करायचा या संदर्भातील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली, कार्यशाळेला पंचायत समिती चांदुर रेल्वे येथील विस्तार अधिकारी एम म्हसतकर यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात हा विकास आरखाडा कसा तयार केला जातो व तो तयार करीत असताना कोणत्या बाबीचा अंतर्भाव असावा, गावाच्या शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पना या लक्षात घेऊन समाजातील वंचित तथा शेवटच्या घटकापर्यंतचा विकास यातून कसा साधावा या विषयी मार्गदर्शन केले,तर मालखेड येथील ग्रामविकास अधिकारी मदनगोपाल गवळी यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करतांना गावात असणारे ईतर शासकीय कार्यालये जसे शाळा,अंगणवाडी,सरकारी दवाखाना,आरोग्यवर्धिनी,पशुवैद्यकीय दवाखाना,तलाठी कार्यालय,आपले सरकार सेवा केंद्र यासाठी आवश्यकते प्रमाणे तरतूद करता येते.यासाठीच हा आराखडा तयार करीत असताना होणाऱ्या ग्रामसभेत गावातील कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असते असे यावेळी मार्गदर्शकांनी सांगितले,ही कार्यशाळा पंचायत समिती चांदुर रेल्वे अंतर्गत आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत मालखेड गणातील मालखेड येथील सरपंच लताताई डोक, ग्रामविकास अधिकारी मदनगोपाल गवळी,मांजरखेड सरपंच दिलीप गुल्हाने,बासलापूर सरपंच सुरेंद्र प्रधान,चिरोडी उपसरपंच संदीप कुमरे,सावंगा विठोबा सरपंच बंडुभाऊ भोजने, ग्रामविकास अधिकारी विनोद मडघे, लालखेड येथील उपसरपंच दारासिंग चव्हाण कवठा कडू सरपंच रेवती राजनेकर असे सात ग्रामपंचायत चे सरपंच तथा तेथील ग्रामसेवक आणि कर्मचारी उपस्थित कार्यशाळेला उपस्थित होते

