चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप….

चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप….

MB-NEWS (अक्षय अथोटे)मेळघाट,चिखलदरा प्रतिनिधी:-
महाराष्ट्रातील शिंदे -फडणवीस सरकारने यंदा गरिबांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे स्वस्त धान्य दुकानात शंभर रुपयांमध्ये एक किलो साखर,एक किलो डाळ,एक तेलाचे पॉकेट,व एक किलो रवा अशी किट देण्याची घोषणा केली होती त्या किटचे वाटप चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथील स्वस्त धान्य दुकानात आज शिधापत्रिका धारकांना करण्यात आले असून काजलडोह येथील शिधापत्रिका धारकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायाल मिळाले परंतू काही जणांमध्ये नाराजी सुद्धा पहावयास मिळाली कारण जी किट दिवाळीच्या आधी मिळायला पाहिजे होती ती दिवाळी नंतर मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र आजपासून तालुक्यातील काजलडोह येथे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे