तमिळनाडूची राजधानी चेन्नईत एक तरुण खड्ड्यात पडला. रस्त्याच्या कडेला लावलेली बाईक काढताना तरुणाचा तोल गेला आणि तो खड्ड्यात पडला. अदामबक्कम परिसरात ही घटना घडली. खड्ड्यात पडलेला तरुण इंजिनीयर आहे. खड्ड्यात पडल्यानं तो जखमी झाला.

पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खणण्यात आले खड्डे तत्परतेनं बुजवले जात नसल्यानं अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. तरुण खड्ड्यात पडत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खड्ड्याशेजारी उभी केलेली दुचाकी सुरू करून ती मागे घेत असताना तरुण खड्ड्यात पडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
तरुण ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा चेन्नई महापालिकेनं खणला आहे. चेन्नईत गेल्या वर्षी पूर आला होता. पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्यानं ही परिस्थिती उद्भवली. त्यामुळे आता महाापालिकेनं पुराचं पाणी लवकर वाहून जावं यासाठी नाले तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. चेन्नई शहरातील जवळपास ६० टक्के भागांमध्ये त्यासाठी खोदकाम करण्यात आलं आहे. हे खड्डे वाहन चालक आणि वाटसरुंसाठी धोक्याचे ठरत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

