ट्रक चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, राष्ट्रीय महामार्गा लगत स्व, लालासाहेब देशमुख महाविद्यालयाजवळील घटना
MB-NEWS प्रतिनीधी (आशिष देशमुख) गुरुकुंज मोझरी :- नागपुर येथुन अमरावतीच्या दिशेने ट्रक घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लालासाहेब देशमुख महाविद्यालयाजवळील ट्रक थाबवुन निबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना आज सकाळी11वाजता च्या दरम्यान घडली ट्रक क्रमांक 01 D.1048 क्रमाकाचा लांब पल्याचा ट्रक नागपुर येथुन अमरावतीच्या दिशेने जात होता आज सकाळी 11 वाजताच्या सुमारात ट्रक मधील 30 वर्षीय चालकाने अचानक महामार्गावरील लालासाहेब देशमुख महाविद्यालयाजवळील शेतशिवारात निबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली बिहार येथील विकास कुमार महतो असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन यासंदर्भात घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस प्रशासन घटनाथळी दाखल झाले असुन बिहार येथील ट्रक चालक विकास कुमार यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली याचे कारण कळु शकले नसुन यासंदर्भात अधिक तपास तिवसा पोलीस प्रशासन करीत आहे.

