प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा निधी त्वरित देण्यात यावा,आम आदमी पार्टीने एसडीओद्वारे पंतप्रधानांना पाठविले निवेदन,चांदूर रेल्वेच्या घरकुल लाभार्थ्यांची घरे ४ वर्षापासून अपूर्ण

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा निधी त्वरित देण्यात यावा,आम आदमी पार्टीने एसडीओद्वारे पंतप्रधानांना पाठविले निवेदन,चांदूर रेल्वेच्या घरकुल लाभार्थ्यांची घरे ४ वर्षापासून अपूर्ण

MB-NEWS(चांदूर रेल्वे) -:पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा निधी त्वरित देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी चांदूर रेल्वेच्या आम आदमी पक्षातर्फे एसडीओमार्फत पाठविण्यात आले.

चांदूर रेल्वे नगरपरिषद अंतर्गत २०१८ मध्ये सुमारे २१५ घरकुलांचा समावेश आहे. या योजनेच्या यादीत त्यांचे नाव आहे, मात्र आजपर्यंत त्यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळालेला नाही. या योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांची खिल्ली उडवली जात आहे. या समस्येसाठी घरकुल लाभार्थी वारंवार प्रशासनाकडे विनवणी करत आहेत, मात्र त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचे आम आदमी पक्षाचे राज्य समिती सदस्य व माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी म्हटले.

पहिल्या यादीत २०१८ सालानुसार २१५ घरे मंजूर आहेत तर दुसऱ्या यादीत २०२० सालानुसार ४०५ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. या सर्वांना अजूनही या योजनेत खूप त्रास सहन करावा लागत आहे. पूर्णत: लाभार्थ्यापर्यंत निधी पोहोचत नसल्याने त्यांचे घर अपूर्ण राहिले आहे. त्यामुळेच आम आदमी पक्षाने स्थानिक एसडीओमाप्फ पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात विनंती केली आहे की, या योजनेतील सर्व घरकुल लाभार्थ्यांना तातडीने न्याय देण्यात यावा. व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्वरित मिळावेत अशी मागणी केली. अन्यथा या समस्याबाबत मोठे आंदोलन उभे करावे लागेल, ज्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी आप नेते नितीन गवळी, मेहमूद हुसैन, राजाभाऊ भैसे, भिमराव खलाटे, कमलकिशोर पनपालिया, महादेवराव शेंद्रे, रमेश गुल्हाने, शेख हसनभाई, विनोद लहाने, शितल बेराड, पुष्‍पा गोखे, कमला पहाडे, संजय डगवार, निलेश कापसे, सागर गावंडे, निलेश होले, अनिल तायडे यांच्यासह अनेक घरकुल लाभार्थी व आप कार्यकर्ते उपस्थित होते.

घरकुल लाभार्थी नाही लावू शकले घरावर तिरंगा – मेहमुद हुसैन केंद्र सरकारतर्फे हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. मात्र ज्यांची घरे चार वर्षांपासून अपूर्ण आहे ते घरकुल लाभार्थी कुठे तिरंगा लावणार ? असा सवाल उपस्थित झाला आहे. यापुढे घरकुल लाभार्थ्यांना निधी न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा आप नेते तथा माजी न. प. सभापती मेहमूद हुसैन यांनी दिला आहे

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे