खासदार,आजी, माजी आमदार व शहरातील स्थानिक काही लोकप्रतिनिधी चांदूर रेल्वे तालुक्याला उपयोग काय ? आम आदमी पार्टीचा पत्रकार परिषदेतून सवाल, उपस्थितज बलपुर एक्सप्रेस व शालीमार एक्सप्रेसचा थांबा चांदूर रेल्वेतून वगळलाघरकुलाचा निधी अप्राप्त, उड्डानपुलाचे काम रखडले

खासदार,आजी, माजी आमदार व शहरातील स्थानिक काही लोकप्रतिनिधी चांदूर रेल्वे तालुक्याला उपयोग काय ?
आम आदमी पार्टीचा पत्रकार परिषदेतून सवाल, उपस्थितज बलपुर एक्सप्रेस व शालीमार एक्सप्रेसचा थांबा चांदूर रेल्वेतून वगळलाघरकुलाचा निधी अप्राप्त, उड्डानपुलाचे काम रखडले

MB-NEWS:-(मंगेश बोबडे) चांदुर रेल्वे:-चांदूर रेल्वे शहरातील रेल्वे स्टेशनवरून जबलपुर एक्सप्रेस व शालीमार एक्सप्रेसचा थांबा वगळण्यात आला असुन वर्धा – भुसावल पॅसेंजर गाडीचा छोट्या स्टेशनवरील थांबे बंद करण्यात आले आहे. तसेच घरकुल लाभार्थ्यांचे ४ ते ५ वर्षापासून निधीअभावी घर पुर्णत्वास गेलेले नाही. १३२ केव्ही प्रकल्प, उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा, रेल्वे उड्डानपुल असे अनेक समस्या निर्माण झाली असतांना लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे लोकप्रतिनीधींचा चांदूर रेल्वे तालुक्याला उपयोग काय असा प्रश्न स्थानिक विश्रामगृहात गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने उपस्थित केला. यावेळी आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य तथा माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी, आप नेते मेहमुद हुसैन, राजाभाऊ भैसे, तालुका संयोजक सागर गावंडे, कमलकिशोर पनपालीया, भीमराव बेराड, महादेव शेंद्रे, मंगेश डाफ, संजय डगवार, निलेश होले, पराग बेराड, नरेश मालवे, पंकज गुडधे, अंबादास हरणे, बाळासाहेब ढोके, श्रीकृष्ण भगत, निलेश कापसे, रमेश गुल्हाणे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना आम आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य तथा माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी म्हटले की, चांदूर रेल्वे शहरात रेल्वे स्टेशन असून या ठिकाणावरून चांदूर रेल्वे परिसरासह तिवसा तालुका व नांदगाव खंडेश्वर येथील प्रवासी सुद्धा प्रवास करतात. अशातच चांदूर रेल्वे स्टेशनवर कोरोनापूर्वी शालिमार एक्सप्रेस या गाडीचा थांबा होता. मात्र सदर गाडी कोरोना नंतर पूर्ववत सुरू झाली असतांना चांदूर चा थांबा हा यातून वगळण्यात आला आहे. अमरावती – जबलपूर एक्सप्रेसचा सुद्धा चांदूर रेल्वेचा थांबा वगळण्यात आल्याचे पत्रावरून दिसून असुन सिंधी सारख्या छोट्या स्टेशनवर मात्र थांबा पूर्ववत देण्यात आला आहे. प्रत्येक रेल्वेगाडी कोरोना नंतर सुरू असतांना प्रथम चांदूर रेल्वे स्टेशन वरून थांबा वगळण्यात येत असून आम्हाला निवेदने देऊन तसेच आंदोलने करून थांबा हा पूर्ववत मिळवावा लागत आहे, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल असे त्यांनी म्हटले. याशिवाय कोरोना कालावधीत लॉकडाऊनपूर्वी वर्धा ते भुसावळ व भुसावळ ते वर्धा या पॅसेंजर रेल्वे गाडीचा टिमटाळा, मालखेड, दिपोरी, तळणी या छोट्या स्टेशनवर थांबा होता. मात्र ही पॅसेंजर गाडी पुर्ववत सुरू झाल्यानंतर हे छोटे रेल्वे थांबे वगळण्यात आले आहे. स्थानिक खासदार हे भारतीय जनता पार्टीचे असून केंद्रात सुद्धा त्यांची सरकार आहे. तरीसुद्धा रेल्वे थांब्याबाबतीत चांदूर रेल्वे तालुक्यावर अन्याय होत आहे. याशिवाय चांदूर रेल्वे शहरात शिवाजीनगर येथून उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु आजही ते अर्धवट स्थितीत असून गेल्या अनेक महिन्यांपासून सदर काम थंडबस्त्यात आहे. रेल्वे फाटकमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हे काम पूर्ण होण्यासाठी कुठलेही ठोस पावले खासदारांकडून उचलल्या गेले नाही. तर आप नेते मेहमुद हुसैन यांनी म्हटले की, चांदूर रेल्वे शहरात पहिल्या टप्प्यात २१५ घरकुले पाच वर्षापुर्वी व दुसऱ्या टप्प्यात ४०५ घरकुले दोन वर्षांपासून मंजूर झाले असून सदर घरकुलाचे काम अजून पर्यंत निधी अभावी पूर्णत्वास गेलेले नाही. प्रत्यक्षात चार ते पाच वर्षापासून चांदूर रेल्वे शहरातील एकही घरकुल लाभार्थ्याचे घर हे पूर्णत्वास गेलेले नाही. विशेष म्हणजे हा प्रश्न केंद्र व राज्य सरकार या दोघांशी संबंधित असून खासदार व आमदार हे दोघेही सत्ता पक्षातलेच आहे, परंतु तरीही असा अन्याय होत असेल तर या लोकप्रतिनिधींचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच जे नागरिक अनेक वर्षांपासून अतिक्रमण जागेवर राहतात त्यांना कायमस्वरूपी पट्ट्याचे मालकी हक्क प्रदान करून त्यांना सुद्धा घरकुल मिळावे अशी आमची मागणी असून त्याकडे सुद्धा लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे आहे. तर राजाभाऊ भैसे यांनी यावेळी बोलतांना म्हटले की, शेतकऱ्यांना दुष्काळ मदत अजून पोहोचली नसुन ती मदत तत्काळ द्यावी. तसेच चांदूर रेल्वे शहरात आरोग्य सुविधेचा अभाव असून शहरात उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून आहे, पण याकडेही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच ६६ केव्ही विद्युत प्रकल्प चांदूर रेल्वे शहरात पुर्वी होता मात्र तो आता ३३ केव्ही करण्यात आहे. मात्र चांदूर रेल्वे शहरात वाढती विजेची मागणी पाहता सदर प्रकल्प १३२ केव्हीचा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी आम्ही केली आहे. असे अनेक प्रश्न चांदूर रेल्वे शहरात निर्माण झाले असून ते सोडविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे. केंद्राशी संबंधित प्रश्न खासदार रामदास तडस यांनी तात्काळ सोडवावे अशी आमची मागणी असून राज्याशी संबंधित प्रश्न सुद्धा खासदार व आमदार या दोघांनी मिळून सोडवावे, कारण दोन्हीकडे त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे असा सुर पत्रकार परिषदेतून निघाला.

१)११ ऑक्टोंबरला घरकुलसंबंधी आंदोलन

घरकुलाच्या मागणीवर येत्या ११ ऑक्टोबरला आम आदमी पार्टीतर्फे शासनाविरोधात स्थानिक एसडीओ कार्यालयात विशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. आमच्या मागण्या जो पर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळावरून उठणार नाही व जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी शासन जबाबदार असेल अशी माहिती आप नेते नितीन गवळी यांनी दिली. तसेच रेल्वे संबंधी मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको कृती समितीतर्फे येत्या काही दिवसांत आंदोलन करण्यात येईल असेही ते म्हणाले.

२) काम होत नसेल तर राजीनामा द्या – नितीन गवळी

जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून जर जनतेचीच कामे होत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींना त्या पदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी स्वेच्छेने राजीनामे द्यावे अशी मागणी आप नेते नितीन गवळी यांनी केली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे