लुंबिनी बौद्ध विहारा मध्ये महार रेजिमेंट डे साजरा माजी सैनिक जगन्नाथ गवई यांचा सन्मान

लुंबिनी बौद्ध विहारा मध्ये महार रेजिमेंट डे साजरा
माजी सैनिक जगन्नाथ गवई यांचा सन्मान

MB-NEWS (चांदुर रेल्वे ):-1 ऑक्टोंबर 1941 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटची स्थापना केली होती. त्यानिमित्त मिलिंद नगर चांदुर रेल्वे मधील लुम्बिनी बुद्ध विहारांमध्ये महार रेजिमेंट डे मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी मिलिंद नगर मधील प्रथम भरती झालेले माजी सैनिक माजी सुभेदार जगन्नाथ गवई यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा तुळसाबाई खवसे, पंचशील पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल मकेश्वर माजी नगरसेवक बंडू आठवले उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
मिलिंद नगर मधील माजी सुभेदार जगन्नाथ गवई यांचा सन्मान करण्यात आला.माजी सैनिक जगन्नाथ गवई हे सण 1954 मध्ये अमरावती 7 महार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. त्यांनी आपले सैनिकी शिक्षण सागर मध्ये केल्यानंतर अनेक ठिकाणी महार रेजिमेंटमध्ये सेवा दिली झाल्या 1962 आणि 1965 या दोन लढाया देखील त्यांनी लढल्या चांदूर रेल्वे नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीरीत्या पूर्ण केली दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले मिलिंद नगर मधील कर्तुत्ववान माजी सैनिकांचा एक रोजी महार रेजिमेंट डेच्या दिवशी सन्मान करण्यात आला.
कोरोना काळामध्ये माजी सैनिक जगन्नाथ गवई यांचे कार्य कार्य उल्लेखनीय होते. त्यांनी आपल्या निवृत्ती वेतनातून एक लाख रुपयाचा किराणा गोरगरीब जनतेला वाटप करून एक नवा आदर्श निर्माण केला अशा कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान मिलिंद नगर मधील बुद्ध विहारांमध्ये करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन माजी नगरसेवक बंडू आठवले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळसाबाई खवसे, सायत्रा गवई,मंगल वानखडे, वनमाला काळे, ममता वानखडे संगीता गवई, मनकर्ण डेरे, आशा गवई,, कल्पना वानखडे,वंदना मकेश्वर अरुणा आठवले, आशा वानखडे, छाया वाहने, पदमा राऊत, सिंधू दुर्येधान, संगीता जवंजाळ, संगीता आठवले, मैना जोशी, अनिता श्रीरामे, मनकर्ण रंगारी, इंदिरा गवई, सुलु आठवले, बेबी वानखडे, मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे