अतिवृष्टी मदतीतून चांदुर रेल्वे मंडळ वगळले
शेतकरी वर्गात असंतोष ; आंदोलनाचा पवित्रा
MB-NEWS (चांदुर रेल्वे) :-गेल्या 4 महिन्यांपासून तालुक्यात सुरू असलेल्या पाऊस आज राहिलेले पीक कापणीवर आले असतांनाही सुरूच आहे, त्यामुळे हाती येणारा घास ही पावसामुळे जाण्याच्या स्टीतीत असतांना शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टी च्या मदतीतून चांदुर रेल्वे मंडळ वगळल्या गेल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे तर त्याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे चर्चा शेतकऱ्यांनमध्ये दिसून येत आहे.
गेल्या जून महिन्यांपासून तालुक्यात पावसाचा सपाटा सुरू आहे आज पीक कापणीला आले असतांनाही पाऊस सुरूच आहे, कधी नव्हे ते तालुक्यातील सर्व नद्या नाले भरले असून त्यांच्या ओलव्यांमुळे ही पीक खराब होत आहे, या ओला दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने अतिवृष्टी ची मदत जाहीर केली तर त्या मदतीला 3 हेकटर पर्यंत मर्यादा नव्या सरकारने घोषित केली, त्यानुसार प्रत्येक तालुक्याला मदत ही पोहचली आहे, तालुक्यातील इतर मंडळातून शेतकऱ्यांच्या याद्या मागविण्याचेही काम शासनाकडून सुरू करण्यात आले आहे,परंतु या मदतीतून चांदुर रेल्वे भाग एक व दोन हे मंडळ वगळण्यात आले असल्याने त्या मदतीचा लाभ येथील शेतकऱ्यांना होणार नसल्याचे समजते. अद्याप या भागातील शेतकऱ्यांच्या मात्र बोलावण्यात आले नसल्याचे कळते. त्यामुळे याभागातील शेतकऱ्यांनमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
चांदुर रेल्वे मंडळातील गावे
चांदुर रेल्वे भाग एक, भाग दोन, कळमगाव, कळमजापूर, सावंगी मग्रापूर, सावंगा विठोबा, शिवणी, धानोरा म्हाली याशिवाय आणखी काही गावांचा यात समावेश आहे
लवकरच उर्वरित मदत मिळणार
या विषयी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना विचारले असता सध्या सप्टेंबर पर्यंतचा अहवाल पाठविला होता त्याची मदत तालुक्याला प्राप्त झाली आहे, त्यात चांदूरची यादी जायची होती अतिवृष्टीची मदत मिळत नसली तरी सततच्या पावसामुळे झालेले नुकसान या निकषात लवकरच चांदुर रेल्वे मंडळाला ही मदत येणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.
मतदार संघातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा
मतदार संघातील तीनही तालुक्यात पावासामुळे अतोनात नुकसान झाले आहे तुरी जळून गेल्या पराटीला अजूनही फुल नाही, सोयाबीन कचऱ्यात दबून गेले ही परिस्थिती मतदारसंघात सर्वत्र असतांना नांदगाव तालुक्यातील चार मंडळ म्हणजे अर्धा तालुका, धामणगाव तालुक्यातील 2 मंडळे आणि चांदुर रेल्वेतील एक मंडळ अतिवृष्टी च्या निकशातून सोडण्यात आले आहे ही मतदारसंघातील शेतकाऱ्यांची क्रूर थट्टा असून याला शासन व प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले आहे

