➖️वाचा दुपारच्या बातम्या ➖️
▪️केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू ! गरुडचट्टी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती
▪️आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना
▪️पुणे, बारामती आणि नगरला रात्रभर पावसाने झोडपलं, पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरुप तर परतीच्या पावसाचा सोयाबीन, कापसाला मोठा फटका
▪️मराठवाड्यात एकाचवेळी तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, दोन महिला शेतकऱ्यांच्या समावेश
▪️राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण, काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली भेट, ठाकरे-पवार सहभागी होणार का?, याकडे राज्याचं लक्ष
▪️पंढरपुरातील सात मजली दर्शन मंडप पाडण्यास विरोध, मंडप पाडण्यापेक्षा बदल करुन वापरात आणा, पंढरपूर मंदिर समिती सहअध्यक्षांची मागणी
▪️शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढणार ? महिन्याभरात अजित पवारांसह सर्व प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
▪️संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, कोठडी वाढणार की, जामीन मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष
▪️बीसीसीआयची आज वार्षिक सर्वसाधारण बैठक, सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी होणार 36वे अध्यक्ष, आशिष शेलारांचीही खजिनदारपदी वर्णी लागणार
▪️मुंबईत मुजोर टॅक्सी-रिक्षा चालकांना चाप बसणार, भाडं नाकारल्यास पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा
▪️राज्यात 23 ठिकाणी आधुनिक वाहन चाचणी केंद्र सुरु होणार, अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉटही दूर होणार
▪️मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज बंद, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत दुरुस्ती काम, 6 तासांच्या विलंबामुळे विमानप्रवास खोळंबण्याची शक्यता

