चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथे लम्पी आजारांमुळे बैल दगावला

  • चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथे लम्पी आजारांमुळे बैल दगावला

(MB-NEWS अक्षय अथोटे मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी)-:
चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथील शेतकरी व पशुपालक सहादेव बुदल कवडे यांच्याकडे बऱ्यांच दिवसांपासून एक बैल असून सहादेव बुदल कवडे यांचे बैल 10 ते 15 दिवसांपासून लंम्पी आजारामुळे त्रस्त होतो. त्या बैलवर लसीकरण सुद्धा करण्यात आले होते पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सुद्धा त्या बैलवर औषध उपचार केले तरी मात्र ती बैल आज दगावला लसीकरण करुन सुद्धा हा आजार कमी होत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये या आजारामुळे भिंतीचे वातावरणच निर्माण झाले असुन पशुसंवर्धन विभागाने या कडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.ही बैल गेल्या काही दिवसांपासून लम्पी आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्या बैलने गेल्या चार ते पाच दिवसांपासून चारा व पाणी खाने बंद केले होते आज दिनांक 20 आक्टोंबर -२०२२ रोजी सदर बैलचे प्राण सोडले.या जिवघेण्या आजारामुळे जनावरे दगावत असल्यामुळे परीसरातील शेतकरी पशुपालक हवालदील झाला आहे प्रशासना द्वारे व शासनाने सदरशेतकऱ्यांला शासनाच्या जीआर नुसार तात्काळ मदत द्यावी अशी मागणी सहादेव बुदल कवडे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया सहदेव कवडे :-शेतकरी व पशुपालक काजलडोह
माझे बैल गेल्या काही दिवसांपासून लम्पी आजाराने ग्रस्त झाला होता व बैलचे लसीकरण सुद्धा झाले होते व गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात गायीचे औषध उपचार करने सुरू होते तरी आज रोजी बैल दगावला.लसीकरण करुन सुद्धा या आजाराने तोंड वर काढले आहे.तरी शासनाने लक्ष देऊन या जिवघेण्या आजारावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे