पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!

पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!

MB-NEWS (मुंबई ):-आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा करतांना म्हणाले की, लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल..

 केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ हजार तरुणांना रोजगार दिला जाईल असं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही रोजगार योजना राबवणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

 पुढे बोलतांना फडवणीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रकल्प आहे. आज ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात ७५ हजार नोकऱ्यांचं लक्ष्य!*
फडणवीस पुढे म्हणाले की, “आम्ही ठरवलंय की येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या द्यायच्या. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही येत्या आठवड्याभरात काढतो आहोत. मुख्यमंत्र्यांनी इतरही विभागांनाही निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर

आरोग्य विभागातही मेगाभरती!
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश महाजन यांनी आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात घोषणा केली. आरोग्य विभागातील १० हजार १२७ जागांसाठी भरती प्रक्रियेचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलं.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे