दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीसांचे मोठे विधान, या तारखेचे दिले संकेत…..मात्र यंदा नागपूरात होणार आहे हिवाळी अधिवेशन 

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीसांचे मोठे विधान, या तारखेचे दिले संकेत…..
मात्र यंदा नागपूरात होणार आहे हिवाळी अधिवेशन 

MB-NEWS (नागपूर):- शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्ट २०२२ला झाला होता.
यावेळी शिंदे गटाचे नऊ आणि भा.ज.पा.चे नऊ अशा १८ जणांचा शपथविधी पार पडला होता.
या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण २० जणांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले.
मात्र त्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला असतानाही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

उर्वरित अनेक आमदार या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहे.
त्यावरूनच ते सातत्याने नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती दिली आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल,
अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
नागपूरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, करोनामुळे गेली दोन वर्ष राज्याचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होत होते.
मात्र यंदा नागपूरात होणार आहे. हिवाळी अधिवेशन कधी सुरु होईल यासंदर्भात अद्याप निश्चित तारीख समोर आलेली नाही मात्र पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाने १९ डिसेंबर २०२२ ला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेण्यात यावे अशी शिफारस राज्यपालांना केली होती.
येत्या काही दिवसांत राज्यपाल हिवाळी अधिवेशनाबाबत तारिख निश्चित करू शकतात.

त्यामुळे डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार हे निश्चित आहे. त्याआधीच राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे