रूढी – परंपरेला पाईक असणारं माझ चांदुर रेल्वे शहर….!
✍️दिवाळी म्हटली की आनंद ,चैतन्य आणि उल्हास ह्याचा जणू त्रिवेणी संगम आणि यातून जन्म पावलेला हा एक सुखद महोत्सवाच….विशेषकरून आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती ह्या दिवाळी सणाच्या निमित्ताने का होईना ,आपल्या घरादाराची मोठ्या लगबगीने साफसफाई करणे,महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आपले घर कसे सर्वांग सुंदर करता येईल ८ दिवसापासून घर अगदी स्वच्छ टापटीप करून ठेवतात.,लहान मुलांन साठी तर या सणाचे एक अनोखे महत्व आहे ,त्यांना आकर्षित करणारी फटाक्याची आतिषबाजी ,नवीन कोऱ्या करकरीत कपड्यांचा उपहार हे सर्वांत आनंददायी बाब.घरात फराळ पाण्याच्या साहित्य बनविण्याची महिला वर्गांची चाललेली लगबग आणि या दरम्यान घरा घरातून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत फराळाचे अनेक पदार्थ बनविताना निघणारा विशेष खमंग सुवास …अगदी मन – चित्त सुखवणारा च म्हणा ना…..धनतेरस पासून सुरू असलेले अभ्यंग स्नान , उटण्याची सुवासिकता जणू शरीरात नवचैतन्य निर्माण करणारी संजीवनीच..तेथून सतत ५ दिवस चालणारा हा उत्सव अगदी खऱ्या अर्थाने मोठ्ठा महोत्सवच …
खास करून आपल्या विदर्भात दिवाळी हा सण काही विशेष संस्कृती ,रूढी – परंपरा घेऊन साजरा करण्याची पारंपरिक पद्धत ही अगदी वाखण्याजोगीच म्हणावी लागेल………………विदर्भ म्हटला की अती उष्ण उन्हाळ्याचा फटका ,दरवर्षी ओला – सुका दृष्काळ असो…..नापिकी असो ….की कोणती कोरोनासारखी महामारी असो ………एवढ्या बिकट परिष्ठीतीतीत कधीच वैदर्भिय माणूस मागे कधी मागे हटला असा आज पर्यंत माझ्या पाहण्यात न आलेलं …इथला शेतकरी ,शेतमजूर ,कष्टकरी जरी आर्थिक परिस्थितीने जरी खांगला असेल तरी सुद्धा कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास कधी घाबरला नाही…..कारण आमची शरीर यष्टी म्हणा ,आमचा काटक आणि राकट पना ह्यांनी माणूस जनी थोडा कडक वाटत असला तरी…बोलण्यात थोडा उर्मट पना जरी वाटत असला तरी विदर्भिय माणूस मनाने अगदी कपाशीप्रमाने कोमल नक्कीच आहे…कारण कपाशी म्हटली की आमच्या विसर्भाच ‘ सोने ‘ उगवणारी खास कारखानदारी आमच्या वैदर्भिय शेतकरी आणि कष्टकऱ्यांची आहे….
शेती इथला मुख्य व्यवसाय, इथल्या जन माणसांनी आपल्या व्यवसायाशी नाळ जोडलेल्या सण उत्सव सुद्धा मोठ्या हर्शोउल्हासाने साजरे करण्याचे धाडस मात्र विदर्भातल्या लोकाताच आहे..
शेतीत काम करणारा ,राबणारा प्राणी म्हणजे बैल ..वर्षातून एकदा तरी ह्या आपल्या सहकाऱ्याला आराम व्हावा त्याचा सन्मान व्हावा यातूनच बैल पोळा हा सण मोठ्या प्रमाणात आमच्या या भागात साजरा केला जातो…
दिवाळी झाल्यावर ‘ गायगोधन ‘ नावाचा उत्सव असतो ,शेतकरी – शेतमजूर ज्यांचेकडे गाय ,म्हैस ,हेला असे पाळीव जनावर आहेत असे लोक अशा सणाला विशेषतः ह्या सर्व प्राण्यांना सजऊन, त्यांची पूजा अर्चा करून गावातून उत्साहाने मिरवणूक काढतात.अशा उत्साहाच्या वातावरणात हे प्राणी जणू आनंद घेतात ,खेळतात बाळगतात म्हणून या सणाला ‘ गाई खेलळण्याचा उत्सव ‘ असे सुद्धा म्हणतात.
गायगोधन या सणाचं मुख्य आकर्षण म्हणजे ह्या शेतकरी – कष्टकऱ्यानी काढलेली पारंपरिक लोककला म्हणजेच ‘ गवळण ‘ ही गवळण जेव्हा निघते त्या वेळी आपले हसू हसू पोट फुटेल की काय अशी अवस्था असते.गवळण म्हणजेच एखादा पुरुष ज्याला थोडा बहुत नाच गाण्याचा शौक असतो तो स्त्रीचे लुगडे अथवा साडी चोळी आणि स्त्रीचा शृंगार करून गवळण बनून आमच्या चांदूर नगरीलतल्या गल्लीबोळातून निघते ..तेव्हा गावातील लोकांसाठी हा अत्यंत मनोरंजनाचा विषय ठरतो.एखाद्या कास्तकराच्या अंगनात ही गवळण नाचली की त्या कसत्कराला घरी गवळण आल्यावर दिवाळी चा उपहार म्हणून पैसे द्यावे लागते अशी ही प्रथा गेल्या अनेक काळापासून आमच्या शहरात आजही बघायला मिळते.
असा हा गोधनचा हा उत्सव मोठ्या दिवाळीचा दिवसात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .आजही आमच्या शहरातील वारसाहक्काने मिळालेल्या ह्या संस्कृतीचे जतन करणारी पिढी आजही हे उत्सव मोठ्या हर्षाने साजरे करतात…पूर्वी काही गवळणीचे गाणी गात गवळण निघत असे …. ‘ गवळण रस्त्यानं चाले…..कुंडल कानात डोले’ .
‘ बेबीनंदा येस्पर पेरला यंदा ‘ असे अनेक पारंपरिक गीत गायन करीत वैदर्भीय लोकांची लोककला आजही आमच्या भागात जिवंत आहे ,या गवळणीच स्वरूप जरी काही अंशी बदलले जरी असेल पण मात्र गवळण म्हटली की तोच आनंद ,तोच जोश ,तीच मौज – मजा करणारा हा सुंदर सोहळा सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून साजरे करतात .. काल आवर्जून मी पूर्वी जिथे वास्तव्यास होतो तिथल्या गल्ली बोळात निघालेली गवळण मला मंत्रमुग्ध करून गेली..आणि आमच्या वर्हडतील संस्कृती हीचे महत्व तुम्हा सर्वांना माहिती व्हावे यासाठीच हा सर्व खटाटोप..
– शब्दांकन –
✍️अतुल प्र.उज्जैनकर ( गुरुजी )
🙏👏👏

