आजच्या ठळक घडामोडी वाचा आपल्या MB-NEWS वर  30/10/22

✍️आजच्या ठळक घडामोडी वाचा आपल्या MB-NEWS वर  30/10/22

▪️नोव्हेंबरमध्ये होणारी पोलिस भरती पुढे ढकलली, पुढील आठवड्यात निर्णय, वयोमर्यादा शिथील होण्याची शक्यता

▪️शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांना पदवी आणि पदव्युत्तर  प्रवेशांना मनाई, अपूर्ण सुविधांचा ठपका

▪️पतीच्या निधनानंतर हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने मंगळसूत्र मोडत, लग्नात आलेले 7 लाख रुपयांचा सोन्याचा हार साईंच्या चरणी अर्पण केला

▪️रवी राणांना पुढे करुन जर कुणी गेम करत असेल तर बच्चू कडूंचा थेट इशारा मंत्रिपद मिळालं नाही तर प्लॅन बी तयार

▪️साखरेवरील निर्यातबंदी एका वर्षाने वाढवली, केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

▪️देव चोरणारा मुख्य आरोपी सापडला, दोघांना कर्नाटकातून अटक, चार मोठ्या आणि एक छोटी मूर्ती हस्तगत, पायताण देवळात विसरले म्हूणन उघडकीस आला गुन्हा

▪️विरोधक बांधावर जातात, गेलं पाहिजे, सगळ्यांना कामाला लावलंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नंदूरबार मेळाव्यात वक्तव्य, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरभरुन मदत दिल्याचा दावा

▪️दाऊदसारख्या कित्येकांना अंगावर घेतलं, सुरक्षा काढणे योग्य नाही: छगन भुजबळ

▪️महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा, उपोषणाला बसलेल्या कैलास पाटील यांची भेट घेण्यासाठी जाणार

▪️25368 कोटींच्या 10 प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली, उदय सामंत यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

▪️देशात ई-हायवे बनवण्याचा प्लॅन, पुढच्या महिन्यात ई-ट्रकचं लॉन्चिग, नितीन गडकरी यांचं आयआयटीयन्सला रिसर्च करण्याचं आवाहन

▪️राज्यात आज कोरोनाचे 319 रुग्ण सापडले,  XBB व्हेरियंटच्या 36 रुग्णांची नोंद

▪️आता सरकारकडे करा ‘फेसबुक, ट्विटर’ची तक्रार; टेक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, सोशल माध्यमावरचा सरकारी अंकुश आणखी वाढणार ?

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे