सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंती निमित्त पोलिस स्टेशन चांदूर रेल्वे येथे एकता दौड चे आयोजन…

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंती निमित्त पोलिस स्टेशन चांदूर रेल्वे येथे एकता दौड चे आयोजन…

MB-NEWS(चांदुर रेल्वे ):- आज दिनांक 31/10/2022 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंती निमित्त पोलिस स्टेशन चांदूर रेल्वे येथे एकता दौड चे आयोजन करण्यात आले असता सकाळी 07:00 वाजता 04 अधिकारी 20 अंमलदार,  NCC कॅडेट्स, शाळेतील विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक,  होमगार्ड, उपस्थित होते.

पोलिस भरती साठी प्रयत्न करणारे उमेदवार तसेच एकूण 60 ते 65 नागरिक उपस्थित होते. एकता दौड टाऊन मधून 4 किलोमीटर घेण्यात आली त्यानंतर पोलिस स्टेशन येथे एकता शपथ घेण्यात आली व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी ठाणेदार सुनिल किनगे व इतर पोलीस कर्मचारी वर्ग व शहरातील काही नागरिक तसेच विद्यार्थी  या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे