अखेर युवा आमदार प्रताप अडसड यांनी सतत पाठपुरवठा केल्याने आले यश,औरंगाबाद नागपूर – महामार्गाची दुरुस्ती चे काम झाले सुरु..

अखेर युवा आमदार प्रताप अडसड यांनी सतत पाठपुरवठा केल्याने आले यश,औरंगाबाद नागपूर – महामार्गाची दुरुस्ती चे काम झाले सुरु..

MB-NEWS(नांदगाव खंडेश्वर) :– धामणगाव रेल्वे मतदारसंघातून जवळपास 65 ते 70 किलोमीटर जाणारा नागपूर- औरंगाबाद महामार्ग मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याने यावर गेल्या आठ महिन्यांत सुमारे 35 ते 40 अपघात झाले . यामध्ये 28 नागरिकांचा जीव देखील गेला होता , तेव्हा या महामार्गाची तातडीने दुरुस्ती व्हावी व अपघाताची मालिका थांबावी याकरिता मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय औरंगाबाद येथे पाठपुरावा केल्याने रविवारी सकाळपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली . नांदगाव खंडेश्वर , चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे अशा तीनही तालुक्यातून जवळपास 70 ते 75 किलोमीटर जाणारा नागपूर – औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून यावर खड्डयाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते . त्यामुळे या महामार्गावर गेल्या आठ महिन्यात जवळपास 28 लोकांचा जीव गेला . ही अपघाताची मालिका थांबावी व रस्त्याची दुरुस्ती तातडीने व्हावी याकरिता औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता . सतत फोनवरून अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली . तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करा , असे निर्देश देखील देण्यात आले होते . आता त्याच पाठपुराव्याला यश आले असून राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीचे काम गुलखेड गावाजवळून सुरू झाली आहे . चांगल्या प्रकारे दुरुस्तीचे काम व्हावे , याकरिता काम सुरू असलेल्या स्थळी जाऊन कामाची पाहणी अडसड यांनी केली .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे