MB-NEWS प्रस्तुत दुपारच्या बातम्या, वाचा..दि.01/11/22
▪️कार्तिकीसाठी पायी निघालेल्या कोल्हापुरातल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, दिंडीत कार घुसल्याने 8 वारकऱ्यांचा मृत्यू, सोलापुरातल्या सांगोल्यात भीषण अपघात
▪️सत्तासंघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
▪️प्रकल्प मविआच्या काळातच राज्याबाहेर, फडणवीसांचा आरोप, आदित्य ठाकरेंनी आरोप खोडून काढले, महाराष्ट्र कुठे कमी पडतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं, शिवसेनेचं आव्हान
पुणे ग्रामीण भागांत असणारे CNGचे पंप अनिश्चित काळासाठी बंद राहणार, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कर्मचारी 1 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर
▪️मोदी सरकारचं महाराष्ट्राला 2000 कोटींच्या उद्योगांचं गिफ्ट, मविआ काळातील उद्योगांबाबत श्वेतपात्रिक काढा, भाजपची मागणी, प्रत्येक उद्योग गुजरातलाच कसा जातो?, राज यांचा सवाल
▪️व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आजपासून 115 रुपयांनी स्वस्त, मुंबईत व्यावसायिक सिलेंडर 1696 रुपयांना मिळणार
▪️यंदा पावसामुळे द्राक्षांचा हंगाम लांबणार! द्राक्षांच्या निर्यात धोरणांमुळे शेतकरी त्रस्त; नेते मात्र राजकरण, आरोप, प्रत्यारोप करण्यात व्यस्त
▪️मै झुकेगा नही, राणांच्या दिलगिरीवर भूमिका व्यक्त करण्यापूर्वी बच्चू कडू समर्थकांचे बॅनर, सरकारमध्ये, बाहेरून पाठिंबा की तटस्थ राहणार याचा सस्पेन्स
▪️पुण्यातील कोंढव्यात हॉटेलच्या इमारतीला भीषण आग, आगीत हॉटेलचं मोठं नुकसान, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
▪️सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षण अधिकारी किरण लोहार अटकेत, 25 हजाराची लाच घेताना जाळ्यात, डिसले गुरुजींवर केलेल्या आरोपामुळे चर्चेत
▪️अवैध वाहतुक जीवावर बेतली! नाशकातील पेठ तालुक्यात प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू
▪️मुंबईत कारमधल्या मागच्या सीटला बेल्ट लावण्यासाठी मुदतवाढ, आजपासून फक्त समज दिली जाणार, 11 नोव्हेंबरपासून होणार दंडात्मक कारवाई
▪️मोरबी पूल दुर्घटनास्थळी पंतप्रधान भेट देणार, मोदींच्या दौऱ्यापूर्वी रुग्णालयाच्या रंगरंगोटीवरुन विरोधकांचा हल्लाबोल

