चतुर्मास अवधुती भजनाच्या मांडीचा आज झाला समारोप…दिवस रात्र न थांबता सतत चालते सव्वा दिवस अवधुती भजन…
MB-NEWS (चांदुर रेल्वे) :- तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील रहिवासी राजेंद्र मारोटकर यांच्या घरी अवधूत महाराजांचे व आदिशक्ती तारामाय यांचे जागृत मंदिर असून स्थानिकांची दर्शनाकरिता नेहमीच रेलचेल असते वर्षभर शनिवार आणि बुधवार तसेच अमावस्या आणि पौर्णिमेला सतत अवधुती भजन चालते, गुरुपौर्णिमा पासून अवधुती भजन प्रत्येक दिवशी संध्याकाळी सुरू असते,कार्तिक पौर्णिमेला त्याची समाप्ती होते या चतुर्मास अवधुती भजनाचा समारोप हा गोमातेच्या पूजनाने होत असून सव्वा दिवस सतत न थांबता अवधुती भजन सुरू असते तसेच समारोपाच्या दिवशी अवधुती भजनाची मांड गोमातेच्या पूजनासाठी गावात निघते या मांडी चे स्वागत गावातील नागरिक अंगणात स्वच्छता ठेवून रांगोळी टाकून करतात तसेच मोठ्या संख्येने या मांडीत अवधुती भजन मंडळी व नागरिक असतात, याप्रसंगी महाप्रसाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यात गावातील समस्त नागरिक या महाप्रसाचा लाभ घेतात आणि शेकडो लोकांची गर्दी राजेंद्र मारोटकर यांच्या घरी पहावयास मिळते
जागृत देवस्थान म्हणून प्रचिती:-
राजेंद्र मारोटकर यांच्या घरी अवधूत महाराज आणि आदीमाय शक्ती तारामाय यांचे मंदिर खूप जुने आहे,असे सांगण्यात येते की एकदा एका भक्ताचा देह साडे तीन दिवस हा तसाच पडून होता भजन ही सतत साडे तीन दिवस सुरू होते,परंतु त्याच्या शरीरात साडे तीन दिवसा नंतर जीव आल्याचे सांगितले जाते अशा अनेक चमत्काराची प्रचिती येथे येते असे भाविक सांगतात तेव्हा पासून या मंदिरात दर्शनाकरिता भक्तांची गर्दी पहावयास मिळते.

