लाचखोर महिला तहसीलदाराच्या मुंबईतील घरात सापडले एक कोटी अलिबागमधून ६० तोळे सोने जप्त.. मीनल दळवींना पोलीस कोठडी …

लाचखोर महिला तहसीलदाराच्या मुंबईतील घरात सापडले एक कोटी अलिबागमधून ६० तोळे सोने जप्त.. मीनल दळवींना पोलीस कोठडी …

अलिबाग :-अलिबागच्या तहसीलदार अजून घबाड मीनल दळवी आणि एजंट राकेश मिळण्याची शक्यता चव्हाण यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर त्यांच्या विक्रोळीतील घरातून एक कोटी रोकड हस्तगत करण्यात आली आहे . त्यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे . न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्या न्यायालयात शनिवारी सुनावणी झाली . न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे . सरकार पक्षातर्फे अॅड . भूषण साळवी , तर आरोपी पक्षातर्फे अॅड . प्रवीण ठाकूर आणि अॅड . अंकुश मोरे यांनी काम पाहिले . मीनल दळवी याची दीड वर्षभरापूर्वी अलिबाग तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती . दळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे . त्यांच्या अलिबाग येथील घराची तपासणी केली असता , ६० तोळे सोने आणि २८ हजार रोकड मिळाली आहे . फिर्यादी यांच्या सासऱ्यांना मिळालेल्या बक्षीसपात्र जमिनीवर नाव चढविण्यासाठी आणि सासऱ्याच्या भावाने बक्षीसपत्रावर घेतलेल्या हरकतीच्या अपील प्रकरणाचा निकाल सासऱ्यांच्या बाजूने द्यावा , यासाठी दळवी यांनी तीन लाखांची लाच मागितली होती . याबाबत फिर्यादींनी २८ सप्टेंबरला रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती . दि . २ ९ सप्टेंबर रोजी पथकाने याबाबत सत्यता पडताळून रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते . महिनाभरापासून लाचलुचपत प्रतिबंधक पथक हे तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते . अखेर ११ नोव्हेंबरला सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली , तर दळवी यांच्यासाठी पैसे घेतल्याचे चव्हाण याने सांगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे