अमरावती विभागातील ‘भारत जोडो’ पदयात्रेला मंगळवारी वाशीम येथून सुरुवात…काँग्रेस आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात हजारो समर्थक रवाना..भारत जोडो यात्रा हे येणाऱ्या परिवर्तनाचे द्योतक – आ. सौ. सुलभाताई खोडके

अमरावती विभागातील ‘भारत जोडो’ पदयात्रेला मंगळवारी वाशीम येथून सुरुवात…काँग्रेस आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात हजारो समर्थक रवाना..भारत जोडो यात्रा हे येणाऱ्या परिवर्तनाचे द्योतक – आ. सौ. सुलभाताई खोडके

MB-NEWS (अमरावती)  :- काँग्रेस युवा नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व अशी ‘भारत जोडो’ पदयात्रा सद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. गेल्या ७ नोव्हेंबर पासून नांदेडच्या देगलूर येथून प्रारंभ झालेली भारत जोडो यात्रा सद्या आठव्या दिवशी हिंगोलीत दाखल झाली आहे. तर मंगळवार १५ नोव्हेंबर पासून अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेला वाशीम येथून सुरवात होणार आहे. अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्यावर अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेची विशेष जबाबदारी असल्याने सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी आ.सौ .सुलभाताई खोडके यांचे रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथून हजारो समर्थक वाशीम करिता रवाना झाले आहे.
काँग्रेस चे युवा नेता राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच त्यांच्या पदयात्रेला महिला ,पुरुष ,युवावर्ग तसेच सर्वसमावेशक जनतेचा उदंड सहभाग लाभत आहे. वारकरी बांधव त्याच बरोबर विद्यार्थी वर्ग सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजर असून “जात -पात ते बंधन तोडो ,भारत जोडो -भारत जोडो असा एकसुर निनादला आहे. महाराष्ट्रात नांदेडच्या देगलूर , नायगाव , भोकर , कळमनुरी , हिंगोली असा प्रवास करत आता नवव्या दिवशी मंगळवार १५ नोव्हेंबर ला भारत जोडो यात्रा अमरावती विभागात दाखल होणार आहे. अमरावती विभागातील वाशीम जिल्ह्यातील अंजनखेड ,बोराळा फाटा गुरुद्वारा जवळ,वाशीम येथून दुपारी ३.३० वाजता राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होईल. राहुलजी गांधी यांचे स्वागत तसेच भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी अमरावतीच्या काँग्रेस आ.सौ. सुलभाताई खोडके या आपल्या हजारो समर्थकांसह वाशीम करिता रवाना झाल्या आहेत . सोमवार १४ नोव्हेंबर रोजी अमरावती रेल्वे स्टेशन चौक स्थित आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालय येथून हजारो कार्यकर्त्यानी भारत जोडो चा नारा देत वाशीम कडे प्रयाण केले .
अमरावती विभागात पाचही जिल्ह्यांना मिळून राहुलजी गांधी यांची पदयात्रा १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान वाशिम जिल्हा दोन दिवस , १७ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अकोला येथे दोन दिवस आणि १९ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाण्यातून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान शेगाव येथे राहुलजी गांधी यांची एक जाहीर सभा देखील होणार आहे. काँग्रेस चे युवा नेते राहुल गांधी यांची ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले , माजी मंत्री अशोकराव चव्हाण , जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात भारत जोडो यात्रेचे आयोजन झाले असून महाराष्ट्रात काँग्रेस ची ताकद दिसून आली . आता अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेला घेऊन अमरावतीवर मोठी जबाबदारी असल्याने वरिष्ठ नेत्यांनी आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते , समर्थक व सर्वसामान्य जनता तसेच धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या नागरिकांनी भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार महोदयांनी केले आहे. तसेच अमरावती विभागातील राहुल गांधी यांच्या १५ ते २० नोव्हेंबर पर्यंतच्या भारत जोडो यात्रेत आ. सौ . सुलभाताई खोडके यांचा सहभाग राहणार आहे.
राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण देश एकवटला असून महाराष्ट्रात याला उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने भारत जोडो यात्रेला घेऊन उत्तम अशी तयारी व नियोजन केल्याने आज सर्व समावेशक जनता यात सहभागी झाली असल्याने हे येणाऱ्या परिवर्तनाचे द्योतक आहे. भारत जोडो पदयात्रे मध्ये देशाच्या एकता , अखंडता व धर्मनिरपेक्षतेचे दर्शन घडत असून सर्वत्र राहुलजी गांधी यांचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्र राज्यात विविध भागात झालेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेसची ताकद दिसून आली असून आता अमरावती विभागातील पदयात्रा निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.
सौ. सुलभाताई संजय खोडके
आमदार , अमरावती विधानसभा मतदार संघ

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे