लेकराप्रमाणे जपलेल्या तब्बल 350 संत्रा झाडांवर चालवला जेसीबी….संत्र्याला भाव नाही,फळ गळतीने त्रस्त; नाईलाजाने घ्यावा लागला शेतकऱ्याला निर्णय…

लेकराप्रमाणे जपलेल्या तब्बल 350 संत्रा झाडांवर चालवला जेसीबी….संत्र्याला भाव नाही,फळ गळतीने त्रस्त; नाईलाजाने घ्यावा लागला शेतकऱ्याला निर्णय…

MB-NEWS (चांदुर रेल्वे) :- एकीकडे आपला देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जातो तर देशातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या केंद्रस्थानी हा शेतकरी असतो तरी देखील शेतकऱ्यांच्या समस्या सुटता सुटेना, अशीच एक घटना चांदुर रेल्वे तालुक्यातील दहिगाव धावडे येथे घडली येथील शेतकरी शरद महादेवराव डुकरे वय 55 यांनी एकूण आपल्या 5 एकर शेतीपैकी 3.5 एकर शेतीवर गेल्या 10 वर्ष वय असणारे संत्रा झाडे होती परंतु झाडांना जेव्हापासून फळ यायला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांना कधीही संत्र्याला भाव मिळाला नाही, संत्रा उत्पादक शेतकरी असूनही त्यांना या वर्षी केवळ 6000 रुपयात आपल्या 350 झाडांची संत्री विकावी लागली तर गेल्या वर्षात हाच माल केवळ 15 हजार रुपयांचा गेला होता,या संत्र्याला लावलेली लागत ही निघत नसल्याने त्यांना नाईलाजाने आपल्या मनावर दगड ठेवून संत्रा झाडांवर जेसीबी चालवावा लागला संत्रा झाडांवर जेसीबी चालवावा लागला जेसीबी चालू असताना मात्र त्यांच्या भावना अनावर झाल्या व त्याना तिथेच रडू कोसळले, गेल्या दहा वर्षापासून पोटच्या लेकरांप्रमाणे या झाडांची देखभाल त्यांनी केली होती उत्त्पन्न मात्र कवडीमोल असल्याने गावात फुकट संत्रा वाटप करायला परवडत पण याची शेती करायला परवडत नाही असा संदेश च जणू त्यांनी यावेळी दिला.

मी एक अल्पभूधारक शेतकरी असून माझ्या 5 एकर शेतीपैकी साडेतीन एकरात संत्रा झाडे होती पोटच्या लेकराप्रमाणे मी त्यांचे संगोपन केले,परंतु मला त्याला कधीही पाहिजे तो भाव मिळाला नाही शिवाय फळगळतीने ही त्रस्त होतो मी यासंदर्भात कृषि सहाय्याक व तलाठी यांच्याशी वारंवार संपर्क केला परंतु मला त्यांच्या विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन अथवा सहकार्य मिळाले नाही म्हणून मी नाईलाजाने माझ्या शेतातील 350 संत्रा झाडे काढून टाकली त्यासाठी मला 10,000 खर्च देखील आला,माझ्या मुलीच्या लग्नावेळी ही संत्रा झाडे मला उत्त्पन्न देईल याच आशेने मी झाडे लावली,परंतु पदरी निराशाच पडली.’
शरद महादेव डुकरे,शेतकरी
दहिगाव (धावडे)

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे