अमरावती विभागात भारत जोडो यात्रेला वाशीम येथून सुरुवात राहुलजी गांधी यांचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले स्वागत १५ ते २० नोव्हेंबर पर्यंत राहुलजी गांधी यांची विभागात पदयात्रा

अमरावती विभागात भारत जोडो यात्रेला वाशीम येथून सुरुवात राहुलजी गांधी यांचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले स्वागत १५ ते २० नोव्हेंबर पर्यंत राहुलजी गांधी यांची विभागात पदयात्रा

 
MB-NEWS(अमरावती ) :- देशाच्या एकता , अखंडता व धर्मनिरपेक्षतेला अधिक बळकटी मिळण्याला घेऊन काँग्रेस चे युवा नेता राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी येथून आरंभलेली भारत जोडो यात्रा सद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यात्रेला जागोजागी अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. आता मंगळवार १५ नोव्हेंबर ला नवव्या दिवशी हिंगोली मार्गे भारत जोडो यात्रा अमरावती विभागातील वाशीम मध्ये दाखल झाली . यावेळी अमरावतीच्या काँग्रेस आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राहुलजी गांधी यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी राहुलजी गांधी यांनी आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या खांद्यावर हात ठेवून “कैसे हो ताईजी”…असे उद्गार काढले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , शिक्षण महर्षी डॉ . पंजाबराब देशमुख , कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या विचारांनी पुनीत झालेल्या व पुरोगामी विवेकी विचार , सामाजिक समता व संत परंपरा जपणाऱ्या अमरावती विभागात “आपका स्वागत है”…. अशा शब्दात आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी राहुलजी गांधी यांचे सहर्ष स्वागत केले.

भारत जोडो यात्रेत शेतकरी, कामगार, कष्टकरी, तसेच सर्वसमवेशक जनता व धर्मनिरपेक्ष विचारांची पक्ष व संघटना सहभागी झाल्याने देशाच्या एकता व अखंडतेला बळकटी मिळाली आहे. यानिमित्ताने काँग्रेसची ताकद दिसून येत असून ही नव्या परिवर्तनाची नांदी असल्याची शुभकामना आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केली. आपणही या यात्रेचा एक भाग बनून आपल्या हजारो समर्थकांसह एकजुटीने यात्रेत सामील होत असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी राहुलजी गांधी समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आ. सौ. सुलभाताई खोडके व पदाधिकारींनी जनतेला हात उंचावित अभिवादन करताच उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता . यावेळी “जात पात के बंधन तोडो , भारत जोडो -भारत जोडो” चा एकसूर निनादला होता . यावेळी राहुलजी गांधी यांच्या स्वागताकरिता मोठा जनसमुदाय देखील लोटला होता . तर आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात अमरावती मधून वाशीम मध्ये दाखल झालेले हजारो समर्थक सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांचे समवेत चालत होते . मंगळवार १५ नोव्हेंबर पासून अमरावती विभागातील वाशीम येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असून पदयात्रा १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान वाशिम जिल्हा दोन दिवस , १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अकोला येथे दोन दिवस आणि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाण्यातून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे राहुलजी गांधी यांची जाहीर सभा देखील होणार आहे . या सभेला महाविकास आघाडी मधील नेते व पदाधिकारी यांची विशेष उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच वरिष्ठ नेते ,त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले , माजी मंत्री अशोकराव चव्हाण , जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेची विशेष जबाबदारी आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्यावर सोपविली असून त्यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या कानाकोपऱ्यातून समर्थकांचे जत्थे च्या जत्थे वाशीम मध्ये दाखल झाले आहे. भारतीयाच्या नव्या जडणघडणीचे शिलेदार होण्यासाठी व राहुलजी गांधी यांचे हात बळकट करून काँग्रेसची ताकद दाखवून देण्यासाठी अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेत सर्व शेतकरी बांधव , कामगार , कष्टकरी, मजूर, महिला भगिनी , युवक बांधव तसेच सर्वसमावेशक जनता व धर्मनिरपेक्ष विचारांचे तमाम नागरिकांनी या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे