तिवसा पंचायत समिती च्या सभापती पदासाठी कल्पना दिवे यांची बिनविरोध निवड….
MB-NEWS (सुनील घोडमारे, प्रतिनिधी) तिवसा पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक मंगळवारी संपन्न झाली.सभापती पदासाठी कल्पनाताई दिवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची तिवसा पंचायत समिती च्या सभापती म्हणून अविरोध निवड झाली आहे.सहा सद्दस्य संख्या असलेल्या पंचायत समिती मध्ये माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे.अडीच वर्षाचा कार्यकाळा नंतर मंगळवारी सभापती पदासाठी निवडणूक पार पडली.कल्पनाताई दिवे यांचा सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता.सूचक म्हणून प.स.सदस्य निलेश खुळे हे सूचक होते.काल दुपारी तिवसा पंचायत समिती सभागृहात निवडणूक पार पडली.कल्पनाताई दिवे अविरोध निवड झाली असल्याने निवडणूक अधिकारी तहसीलदार अधिकारी वैभव फरतारे यांनी घोषित केली.सभागृहात पंचायत समिती सदस्य शिल्पाताई रवींद्र हांडे,रोशनीताई मुकुंद पुनशे,निलेश खुळे,सत्तार इसाख मुल्ला,शरद वानखडे उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार वैभव फरतारे व निवडणूक लिपिक प्रवीण गिऱ्हे यांनी काम पाहिले.

