पद्मश्री पोपटराव पवार यांची आदर्श गाव निवडीकरिता मेळघाटातील बारू गव्हाण गावात सभा संपन्न
MB-NEWS:-अक्षय अथोटे (मेळघाट, चिखलदरा प्रतिनिधी):-चिखलदरा तालुक्यातील बारुगव्हाण गावात आदर्श गाव निवडी करिता सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांचा प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून झाली. उपस्थित मान्यवर व गावातील लोकांना मार्गदर्शन करताना पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले की, आम्हाला वर्ष 2020 ला जिल्हाधिकारी यांचा माध्यामातून आदर्श गाव समाविष्ट करण्यासाठी राज्यस्तरीय समिती कार्यालय पुणे येथे ग्राम पंचायत ठराव पाठविण्यात आले होते.परंतु
कोरोना काळ चालू झाल्याने आम्ही तुमचा गावात आलो नाही. आम्ही फफक्त तुम्ही पाठवलेले कागद तपासणी करणे साठी आलो आहोत. आमचा मतानुसार येथे काहीही होणार नाही ग्राम सभा जो निर्णय घेणार त्याच्यानुसार काम होणार आहे. आदर्श गाव योजनेची अमलबजावणी करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थाची निवड सर्व गावकरी लोकांनी करावयाची आहे.आदर्श गाव योजनेत मेहरीआम,भंडोरा,कामीदा बारुगगव्हाण या गावाची निवड झाली आहे.आदर्श गाव करणेसाठी गावातील सरपंच,पोलीस पाटील,ग्रामसेवक, तलाठी शिक्षक,विधुत विभाग,आरोग्य कर्मचारी,वनविभाग,कृषी विभाग, ग्रामरोजगार सेवक व विशेष गावातील स्थानिक लोकांची मदत असणे खूप गरजेचे आहे.आदर्श गाव योजनेत गावात स्वच्छतागृह निर्मिती करणे, पाण्याची व्यवस्था करणे,लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे रस्ता निर्मिती,जलसंधारणाची कामे,अशी अनेक कामे आदर्श गाव योजनेत करू शकतो.

