इ- पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त….
MB NEWS:प्रतिनिधी:-पवन ठाकरे(नांदगाव खंडेश्वर)
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील इ पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे स्वस्त धान्य दुकानात धान्यसाठा उपलब्ध असतानाही लाभार्थ्यांना धान्य वितरित करता येत नसल्याची गंभीर समस्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात निर्माण झाली आहे. कधी नेटवर्क समस्या तर कधी लाभार्थ्याच्या अंगठ्याचे ठसे स्कॅनिंग न होणे अशी समस्या निर्माण झाल्या आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार तसेच लाभार्थी कंटाळले असून तालुक्यातील परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार रात्री धान्याचे वाटप करीत आहे मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे दुकानात गर्दी दिसून येत आहे. सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने इ – पॉस मशीन प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करणे स्वस्त धान्य दुकानदारांना बंधनकारक केले आहे आता हीच प्रणाली दुकानदार तसेच लाभार्थ्यांना अडचणीची ठरत असल्याचे चित्र नांदगाव खंडेश्वर परिसरात दिसून येत आहे या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकाकडून व दुकानदाराकडून होत आहे.

