जयहिद मंडळाच्या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन उत्तम स्वामीजीं च्या हस्ते संपन्न,निलेश विश्वकर्मा यांनी पत्नीसह आदिवासीं सोबत घेतला नृत्यात सहभाग…
मुलांमधील संस्कार आणि आज्ञा पाळणे हीच खरी संपत्ती
MB-NEWS (चांदूर रेल्वे):-जयहिंद क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उदघाटनपूर्वी शहरातून ढोलताशांच्या गजरात भव्य क्रिडा रॅली काढण्यात आली यावेळी मेळघाटातील आदिवासी लोक कलाकारांनी आपल्या संस्कृतीचा परिचय देत, पारंपारिक वस्त्र परिधान केलेल्या होते तर जयहिंद मंडळाच्या तरूण फेटे घालुन रॅलीत सहभागी होते.मैदानाच्या मुख्य गेटवर रॅलीतील उद्घाटक ध्यानयोगी महामंडलेश्वर उत्तम स्वामीजी,वामन महाराजा सह ठाणेदार सुनिल किगने मंडळाचे अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा व निमंत्रित सर्व पाहुण्यांचे अक्षवान करुन स्वागत करण्यात आले व ढोलताशाच्या गजरात पाहुण्यांना मंचावर आसनस्थ करण्यात आले पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रजलित करुन राष्ट संताच्या फोटोचे पुजन करीत क्रिडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली व जय हिंद मंडळाचा क्रिडा ध्वज फडकवून मैदानाचे पुजन करत स्वामीजींच्या हस्ते नारळ फोडण्यात आले ढोलताशोच्या गजरात उद्घाटक समूचे परिचय करीत आमंत्रीत पाहुणे महामडलेश्र्वर उत्तम स्वामीजी महाराज, संत वामन महाराज (सावनेर), एस.डी.पी.ओ.जितेंद्र जाधव,शहर पोलीस अधीक्षक सुनील किगणे,दीपक डहाणे, डॉ.विश्वकर्मा, प्रकाश मारोटकर हजारो क्रीडाप्रेमींच्या साक्षीत मंडळाचे अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी श्री उत्तमजी स्वामी,सावनेर येथिल वामन महाराज यांचे शाल व श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले व मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय हिंद मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यानी केले कार्यक्रमाचे संचलन प्रवीण मोहड आभार प्रदर्शन केशव केने यांनी केले या वेळी मंडळाचे सचिव पंकज वानखडे,मिथिलेश विश्वकर्मा, दिपक डाहाने, प्रशान्त बोबडे,श्रीकांत भोयर, केशव केने, प्रशांत मस्के, राजिक शेख, राजिक पठाण, विनोद वानखडे, प्रवीण खेडकर,श्रीकांत भोयर,रोशन जालान, अंनत कडूकार,बोहरा,योगेश खेरकर,अभिजित राठोड, संकेत उक्के, आकाश उरकुडे,आशिष माकोडे , चेतन भुत, विक्की आस्वले,बिपिन देशमुख,पप्पू खेरकर सह मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थिति होते .
निलेश विश्वकर्मा यांनी पत्नीसह आदिवासीं कलाकारा सोबत नृत्यात सहभाग घेऊन आनंद घेतला
या सोहळ्यात मंचावरील पाहुण्यासह उपस्थितीत लोकांचे आदिवासी नृत्याने लक्ष वेधूत लोकांची मने जिंकली.पारंपारिक वेशभूषा आणि ढोल,बासुरी,मंज्जीरा च्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.हे सुंदर नृत्य पाहून नीलेश विश्वकर्मा यांना आपल्या नृत्याचा मोह आवरता आला नाही म्हणून त्यांनी पत्नीसह नृत्यात सहभाग घेत ताल धरला हे पाहून उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवीत मेळघाटच्या आदिवासींना संस्कृतीचा आनंद लुटला.
मुला मुलींना संस्कार आणि आज्ञाधारक बनवने हीच खरी संपत्ती
पंच अग्नि अखाडा येथील महामंडलेश्वर उत्तम स्वामीजी म्हणाले की, ज्या प्रमाणे लोकांना रामायणानातील पात्र लक्षात लक्षात आहे त्याच प्रमाणे चांदूर रेल्वे शहरातील जनता हा खेळ व निलेश विश्वकर्मा यांना या खेळाच्या माध्यमातून लक्षात ठेवतात.मुलासाठी धन संपत्ती कमविण्या पेक्षा उत्तम शिक्षणासोबत मुलावर चांगले आचार विचार रूजविने बळकट शरीर व चांगले संस्कार आणि आज्ञाधारक बनविने हे जरूरी आहे असे स्वामीजींनी उपस्थित जनसमुदाय समोर म्हटले.

▪️जय हिंद मंडळाचे नियोजन आणि तुमची उपस्थिती हेच आमच्या कर्तृत्वाचे प्रतीक -: निलेश विश्वकर्मा
जय हिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी सांगितले की क्रीडा क्षेत्रात चांदूर हे नाव आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात परिचित आहे, जिथे विदर्भ, राज्यस्तरीय कबड्डी, कुस्ती, हॉलीबाल स्पर्धांचा उल्लेख येतो तिथे जय हिंद क्रीडा मंडळाचे नाव आणि आयोजनाचे कौतुक केले जाते.या खेळामुळे माझ्या गावाचे तहसीलचे नाव मोठे होते ही जय हिंद मंडळासाठी अभिमानाची बाब आहे.आम्ही मंडळाच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी शहरात रुग्णालय बांधण्याचा मानस आहे. मडळ नेहमी सामाजिक कार्यात योगदान देतो आणि यापुढेही करत राहू अशी ग्वाही देतो.

