- ग्रीन फाउंडेशन व दत्त समिती यांनी दत्त जयंती निमित्त तळेगाव ठाकूर येथे स्पर्धा परीक्षा आयोजन.
MB-NEWS (सुनील घोडमारे,तळेगाव ठाकूर):-प्रत्येक विद्यार्थी हा स्पर्धेत सहभागी होत असतो, तेव्हा त्याने कश्याप्रकारे त्या परीक्षेला सामोरे जावे तसेच मुलांचे भविष्य कसे उज्वल होईल या उद्देशाने ग्रीन फाउंडेशन हि संस्था कार्य करीत असते. आपण आपल्या समुदयाचा विकास कश्याप्रकारे करू शकतो याचा विचार ही संस्था करते या संस्थे मध्ये तळेगाव ठाकुर मधील संपूर्ण युवा पिढी कार्यरत आहे त्यामुळे या संस्थेचा समाजाच्या विकासासाठी कसा फायदा होईल व आपले गाव कसे आत्मनिर्भर बनेल याचा प्रयत्न करीत असते. शरीर ,मन ,बुद्धी ,आणि आत्मा प्रसन्न राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे वाढत्या व्यसनाधीनते पासून मुलांना मुक्त करून चांगल्या मार्गाला लावायचे असेल तर व्यायाम शाळा उघडल्या पाहिजेत म्हणून ग्रीन फाउंडेशनणी ग्रीन ॲकॅडमी सुरु केली आहे. तसेच एक व्यक्ती , गाव , तालुका , जिल्हा , राज्य , देश , कसा घडेल कश्याप्रकारे आत्मनिर्भर बनेल हा दृष्टिकोन समोर ठेऊन ग्रीन फाऊंडेशन तळेगाव ठाकूर तर्फे ” दत्त जयंती निमित्त स्पर्धा परीक्षा” हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये पाचवी ते दहावी -या वयोगटातील विद्यार्थ्यां चां समावेश होता तसेच ऐकून-295 विद्यार्थी परीक्षेला होते त्यामध्ये टॉप 10 विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संजयराव बेलसरे व प्रमुख पाहुणे सरपंच दर्शनाताई मारबते उपसरपंच सतीश दादा पारधी दत्त संस्थानचे अध्यक्ष सुधाकरराव बेलसरे संदीप दादा बेलसरे दिलीप दादा बेलसरे आढाव काका डॉ.प्रवीण बेलसरे ग्रीन फाउंडेशन अध्यक्ष वैभव दादा श्रीखंडे सर्व सहभागी सदस्य -हे उपस्थित होते यांनी वर्गशिक्षक म्हणून 10 शिक्षक अधिकारी या उपक्रमात मार्गदर्शन केले. तसेच यांमध्ये संपुर्ण ग्रीन फाऊंडेशन टीम तळेगाव ठाकूर सहभागी झाली होती अशाप्रकारे हा ” दत्त जयंती निमित्त स्पर्धा परिक्षा” हा उपक्रम पार पडला.

