रक्तदान करून वाहिली डॉ.बाबासाहेब आदरांजली..६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
MB-NEWS (प्रदीप भुसारी,धामणगाव रेल्वे):– विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तदान समितीने रक्तदान करून अनोखी आदरांजली वाहिली आहे. यंदा ६६ रक्तदात्यानी रक्तदान केले. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान समिती रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते. यंदा हे १२ वे वर्ष असून आतापर्यंत १०२४ रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सकाळी स्थानिक नगर परिषद प्रागणात असलेल्या विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या देशातील प्रत्येक मानवाला माणूस म्हणून समतेचा अधिकार देणारे, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभीवादन केले. त्यानंतर महामानवाला अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत केले गेले.यात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सावंगी मेघे रक्तपेढी चमुने रक्त संकलनाचे कार्य सर्व श्री डॉ. बागेश्री पाठक. सिस्टर भावना मेश्राम टेक्निशियन नि ता ढोरे डॉ भारती पवार डॉ. अंकिता ज्ञानचंदानी डॉ. दिव्या राठोड डॉ. गरिमा चंद्राकर रानी महाकालकर राजेश सावळे नितीन भोयर
रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तदान समिती चे अनिलभाऊ वहिले प्रविण हेडंवे राजुभाऊ बोरकर प्रशांत मुन अनुप पुरोहित प्रदीप भुसारी छगन जाधव मंगेश सोनोने सुनिल स्थुल संजय तुपसुंदरे सिद्राथ टाले मिलीदं वहीले अंकुश कोंडेकार राज वहिले आंनद राॅय प्रविण रोहणकर विनोद तलवारे राजुभाऊ अग्रवाल ज्योती पाटील पवण झटाले शुभम हेडंवे अशोकराव मोहड मनोज ठाकरे भिमराव सहारे दिनेश वाघमारे सागर शेळके राजुभाऊ मनोहरे छंदकभाऊ हगवणे प्रशात हुडे सरज गावंडे प्रमोद भिमटे प्रविण सुटे बंडू भोयर सिध्दाथॅ बेंडे सिध्दाथ टाले अक्षय धोपटे सिवा लसवंते दिलीप मुळे शुधूदोन सोनोने अल्पेश बन्सोड अनिल ओगले मंगेश तायडे सुरेन्द तायडे आणि मित्रपरिवारांनी अथक परिश्रम घेतले.

