चांदूर रेल्वे येथे आंतर शालेय कुराश जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न विद्यार्थ्यांची विभागीय कुराश स्पर्धेसाठी निवड

चांदूर रेल्वे येथे आंतर शालेय कुराश जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न विद्यार्थ्यांची विभागीय कुराश स्पर्धेसाठी निवड…

MB-NEWS चांदुर रेल्वे(अमरावती):-दि. ११ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अमरावती यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित आंतर शालेय अमरावती जिल्हास्तरीय कुराश स्पर्धा २०२२ क्रीडा संकुल चांदुर रेल्वे येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये म.न.पा मधील ०६ शाळेचा सहभाग मिळाला. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली या स्पर्धेमध्ये उद्‌घाटक म्हणून लाभलेले चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार अध्यक्ष म्हणून अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत कारमोरे, प्रमुख पाहुणे बी.डी.एस हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा अमरावती कुराश असोसिएशनचे कोषाअध्यक्ष अशोक मोटघरे, अमरावती जिल्हा कुराश स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव संदिप कि.देशमुख, डॉ गणेश वराळे, डॉ क्रांतीसागर ढोले, डॉ सागर वाघ, हर्षलभाऊ वाघ, क्रीडा शिक्षक तायडे, हेमंत कामोडे, सोनल रंगारी, शिल्पा यादव, मंद्या मोहरील, राजश्री शाहू विद्यालयाचे असलम खान, अभिषेक अवसर, शिवाजी घुंगे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता पंच म्हणून लाभलेले संघरक्षक बडगे, श्रीकांत मोधळे, कु भाग्यश्री सोळंके, कपिल धामणकर, अंकुश निमजे, राहुल आठवले प्रमोद सोनवाने, चेतन भोले, यश संग्राम, शिरसागर हे होते. तसेच जिल्हा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, महाराष्ट्र कुराश संघटनेचे सचिव शिवाजी साळुंके यांच्या मेहनतीचे हे फळ आहे व स्पर्धेकरीता त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे