नांदगांव खंडेश्वर तालुक्यात 17 ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा,विजयी उमेदवारांचा जल्लोश तालुक्यात अपक्षांचा बोलबाला…

नांदगांव खंडेश्वर तालुक्यात 17 ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा,विजयी उमेदवारांचा जल्लोश तालुक्यात अपक्षांचा बोलबाला…

पोलिसांच्या बंदोबस्तात मतमोजणी कार्यक्रम शांततेत संपन्न

MB-NEWS(पवन ठाकरे )नांदगाव खंडेश्वर :-तालुक्यातील ऑक्टोबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 17 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील 17 ग्रामपंचायती पैकी 1 ग्रामपंचायत (चिखली वैद्य) अविरोध निवड झाली होती. उर्वरीत 16 विजयी ग्रामपंचायती च्या उमेदवारांनी सुद्धा त्यास सोबत जल्लोष साजरा केला आहे. तसेच मतमोजणी कार्यक्रमात कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता नांदगांव खंडेश्वर पोलीस निरीक्षक विशाल पोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणीचा कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून तालुक्यातील मतदारांचे आभार व्यक्त केले.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये खालील विजयी झालेले व पराभूत झालेले सरपंच पदाचे उमेदवार

चिखली वैद्य
अविरोध
1) दिपाली अमोल दांडगे

कोदोरी
१) लीना गजानन केणे – २६३ विजयी
२) बालिका दिगंबर दांडगे – १४३ पराभव
सावनेर
१) अर्चना विनोद ठाकरे – ६३६ विजयी
२) सरोज प्रमोद तायडे – ६०२ पराभव
लोहगाव
१) सीमा बाबाराव सानप – ७६४ विजयी
२) मंदा विनायक नागरगोजे – ३९५ पराभव
खिरसाणा
१) विशाल मेश्राम – २७१ विजय
२) निवृत्ती जगताप – २२६ पराभव
माऊली चोर
१) संगीता अनिल झंजाट – ५७८ विजय
२) ममता प्रदीप चोरे – ४०८ पराभव
शेलुगुड
१) कांताबाई वसंतराव सावंत – ५७१ विजयी
२) शीला रुपराव मुंदे – ४७३ पराभव
*राजना काजणा*
१) नरेंद्र सुदाम मुंदे – ६६४ विजयी
२) बबन भगवान बोरकर – ३४१ पराभव
पुसनेर
१) मदन केशवराव काजे – ३२१ विजयी
२) पंकज भास्कर काजे – २४२ पराभव
साखरा
१) आकाश प्रदीप गिलबे – ३१८ विजयी
२) विनोद लक्ष्मण भो – ३१५ पराभव
खेड पिंपरी
१) मंगेश हंसराज कांबळे – ३८३ विजयी
२) किसन रामचंद्र खंडारे – ३४६ पराभव
येवती
१) पुनम प्रशिल वायरे- ५७९ विजयी
२) माया गोकुळ राठोड – २९९ पराभव
पाळा
१) पंकज भानुदास मेटे – २७७ विजयी
२) प्रमोद शालिकराम मेटे – २२२ पराभव
पिंपळगाव बैनाई
१) अरुणा शुक्राचार्य सवई – २९६ विजयी
२)अस्मिता प्रफुल साखरे – १८३ पराभव
रोहना
१) अमरीश विलासराव काकडे – ५३२ विजयी
२) शिल्पा विजय रोहनेकर – ३४० पराभव
वडाळा
१) संजय रामभाऊ शेटे – ५६७ विजयी
२) प्रशांत पंजाब मुरादे – ४५७ पराभव
भगुरा
१) विनायक दंदे – २१५ विजयी
२) सुनील जाधव – १५९ पराभव

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे