वन कामगाराचा 21डिसेंबर विधान भवन नागपूर येथे आज मोर्चा…सामाजिक वनीकरणाचे शेकडो कामगार जाणार तालुक्यातून मोर्चाला
MB-NEWS नांदगाव खंडेश्वर( पवन ठाकरे):-महाराष्ट्र राज्यातील वनविभाग, सामाजिक वनिकरण व वनविकास महामंडळ मधिल रोजदारी तथा कायम झालेल्या वनमजुराचे प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत आज पर्यंत शेकडो निवेद १०० हून जास्त आमदार, खासदारांनी शिफारस पत्र दिले आहेत मात्र आजी माजी सरकार सदर निवेदनाला केराचे टोकरीत टाकत आहे सदर कामगार हे आदिवासी जंगल वाचविण्याचे काम करीत आहेत. त्यांचे ५ वर्षांचे वर अधिक सेवा होउनही त्यांना शासकीय नोकरीत कायम केले नाही. तत्कालीन मुख्यमन्त्री सुशिलकुमार शिंदे यांनी सन २००४ रोजी दिनांक ०१/११/९४ ते ६०/०६ ०.४ पर्यंत सेवा झालेल्या सर्व योजनाच्या कामगारांना कायम करण्याचा निर्णय घेतला होता ते प्रस्ताव शासन दरबारी पडून आहेत.
जूनी पेंशन योजना लागू करणे, ज्याची सेवा ५ वर्षाच्यावर झाली आहे अशांना कायम करण ज्यांची सेवा आजरोजी पर्यंत ५ वर्षाचे वर अधिक झाली आहे. अशांना शासकीय सेवेत कायम करणे, जुन्या कामगारांना पूर्ववत कामावर घेणे वन विकासमहामंडळ खामगाव मधील पात्र कामगारांना न्याय देणे, वारसा हक्क, पदोन्नती, उपदान मिळणे आदिबाबत चे निवेदन मुख्यमंत्री, वनमंत्री व इतर संबंधीत लोकांना दिले आहेत तरी विनंती की, नागपूर येथे होणा-या २१ / १२ / २२ च्या आंदोलनापूर्वी महाराष्ट्र राज्य वन सामाजिक वनिकरण व वनविकास महामंडळाच्या संघर्ष समितील शासन दरबारी चर्चेला पाचारण करावे व सकारात्मक निर्णय घ्यावा.
अन्यथा महाराष्ट्रातील वन वनिकरण व वनविकास महामंडळातील हजारो कामगार नागपुर अधिवेषनावर धरणे आंदोलन करून लढा देणार आहेत असे राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण माहोरे अमरावती को उध्दव शिंदे, परभणी, व्ही.टी. लोणकर, आकोला व कॉ. वि. के. पांचाळ नांदेड यांनी पत्रकाव्दारे केले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वनीकरणामधील कामगार अरुण परसनकर, अशोक दैत, शेख हबीब शेख लतीफ, राजू धांडे, शोभा रोकडे, प्रकाश वेरुळकर, महादेव आमटे, नारायण पारवे, रामकृष्ण शिंगारे, मंगला शिंगारे, राजू गव्हाणे यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित राहणार आहेत.

