राज्यात पुन्हा मास्क सक्ती? आणि कडक निर्बंध; आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे विधान..
🦠संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने आता आधीच योग्य ती पाऊलं उचलण्यास सुरुवात केली केली असून राज्यात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे..
😷 सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वे प्रवासातही मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. चीन जपान अमेरिकेत कोरोना संकट पुन्हा वाढतंय. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत मॅरेथॉन बैठक सुरू आहे. त्यात मास्क सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नवं वर्ष स्वागत लक्षात घेता ही नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. यावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, केंद्राने राज्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून त्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
🦠राज्यासह केंद्रातही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे.
🧐 हा टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत सरकारला सूचना करणार आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा निर्बंध लागणार, पुन्हा मास्क लावावा लागणार का, असा प्रश्न जनतेसमोर आहे.
चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतात सापडले.
चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण भारतात सापडले असून गुजरातमध्ये तीन तर ओडिशामध्ये 1 रुग्ण सापडला असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलीय.
🚨 केंद्र सरकार ॲक्शन मोडवर
दरम्यान केंद्र सरकारही ॲक्शन मोडवर आलंय. देशात मास्कसक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना केल्यायत.
😷 गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा
💉 ज्येष्ठ नागरिकांनी तसेच आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्यावा
🏫 शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
🚓 अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश
🧪 न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा

