१०वी-१२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होणार लेखी परीक्षा..!!

१०वी-१२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होणार लेखी परीक्षा..!!

▪️ राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम नियोजन केले असून, हे वेळापत्रक सर्व शाळा-महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच लेखी परीक्षा सुरु होणार आहे.

📄 प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक..

दहावी
▪️ 10 फेब्रुवारी ते 1 मार्च
▪️ परीक्षा केंद्रे : 5000
▪️ अंदाजित परीक्षार्थी : 16 लाख

बारावी
▪️ 1 ते 20 फेब्रुवारी
▪️ अंदाजित परीक्षा केंद्रे : 3000
▪️ अंदाजे परीक्षार्थी : 15 लाख

▪️ बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा, तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 दिवसांचा अवधी दिला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचेही प्रात्यक्षिक त्याच वेळी पार पडेल. प्रश्नपत्रिकांची संपूर्ण तयारी झाली आहे.

▪️ बारावीच्या परीक्षेनंतर लगेच 21 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. जानेवारीत शाळा-महाविद्यालय स्तरावर दहावी-बारावीची सराव परीक्षा होणार असून, त्याचे नियोजन मुख्याध्यापक संघाने केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे