शिवसेनेच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांची तुरीची झाडे घेऊन तहसील कार्यालयावर धडक
*तुर पिकांवर दवाड गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान*
*तुरीची झाडे घेऊन नुकसान भरपाईची केली मागणी*
MB-NEWS नांदगाव खंडेश्वर(प्रतिनिधी):- तालुक्यातील शेकडो हेक्टर तूर पिकांवर दवाड गेल्याने वायरस रोगाने तूर सुखल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले तूर पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनि तुरीची झाडे घेऊन तहसीलदार यांच्या टेबलवर टाकून शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात तहसीलदारांना एक तास घेराव करून निवेदन सादर केले
तूर पिकांवर दवाळ गेले त्यामुळे अचानक वायरस चा प्रादुर्भाव झाल्याने तूर वाळायला लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावल्या गेला आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे त्यात पिक विमा अद्याप मिळाला नाही म्हणून तूर पिकांचे सर्वेक्षण करण्यात यावे व पीक विमा देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनि तुरीची झाडे तहसीलदार यांच्या टेबलावर टाकून एक तास घेराव करून आपला रोष व्यक्त केला व मागणीचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी सरपंच मंगेश कांबळे, माजी सरपंच मधूकर कोठाळे,श्रीकृष्ण सोळंके, मनदेव चव्हाण उपतालुका प्रमुख अक्षय राणे आशिष भाकरे गुणवंत चांदूरकर रवी ठाकूर रमेश पेटकर दिपक सुने चेतन डकरे दिनेश पकडे प्रमोद डकरे लीलाधर चौधरी बालू झिमटे सौरभ सुने नितीन सुने प्रकाश इखार भूमेशवर गोरे पिंटू तुपट मनोज ढोके चेतन धवने अरुण कापडे प्रशांत ढोके रवींद्र दांडगे निलेश मारोटकर अक्षय हिवराळे शुभम रावेकर शुभम सावरकर अनिल मारोटकर इत्यादी शिवसेनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते
*सात दिवसांत विमा द्या अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार*
सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा न झाल्यास शेतकऱ्यांन सह सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देत प्रकाश मारोटकर यांनी कृषी अधिकारी व तहसीलदार जबाबदार राहील असे सांगितले.

