सावित्री शक्तिपीठ, चांदुर रेल्वे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी..

MB-NEWS (चांदुर रेल्वे ):-चांदुर रेल्वे शहरातील माळी पुरा येथे नुकतीच सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनिषा कोठेकर प्रमुख पाहुणे मंदा देशमुख व सर्व महिला यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले.

“सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळपासून पाच किमी अंतरावर होते. सावित्रीबाई फुले या माता लक्ष्मी आणि वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या, त्या माळी समाजातील होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि जोतिरावांना स्वतःची मुले नव्हती. ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतल्याचे सांगितले जाते. ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी १८ शाळा
उघडल्या.” असे येथील महिला वर्ग यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
यावेळी शुभांगी वानरे, वैशाली कांडलकर, पूजा वाघ,छाया भोयर, जयश्री वाघ (माजी न. प. सदस्य)हे सर्व यावेळी यांची उपस्थिती लाभली तसेच चांदुर रेल्वे येथील शेकडो महिलांनी उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे