सावित्रीबाई फुले यांची जयंती,शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा डोमा येथे मोठ्या उत्साहाने साजरी

सावित्रीबाई फुले यांची जयंती,शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा डोमा येथे मोठ्या उत्साहाने साजरी

MB-NEWS :-अक्षय अथोटे
मेळघाट, चिखलदरा प्रतिनिधी:-दिं. 3 जानेवारी 2023 ला शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा डोमा तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या हिरेरीने या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सावित्रीबाईची लेक असलेली कुमारी हसीना विनायक उईके वर्ग बारावा व प्रमुख अतिथी म्हणून कुमारी रामकला रामदास इवने वर्ग अकरावा या विद्यार्थिनींनी भूषविले. त्याचबरोबर सावित्रीबाईंची जयंती म्हणजे बालिका दिन म्हणून मंचकावर वर्ग सहावीची विद्यार्थिनी चांदणी भूसुम व सजनी बेठेकर वर्ग पाचवा यांना विशेष अतिथी म्हणून मंचकावर स्थान देण्यात आले. तसेच सावित्रीबाई ची वेशभूषा धारण करून कुमारी राणी मानू धिकार वर्ग दहावा ही विद्यार्थिनी सुद्धा मंचकावर उपस्थित होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन तसेच महिला शिक्षिका दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जात होती म्हणून या कार्यक्रमाला शाळेतील सर्व महिला शिक्षक यांना मंचकावर विशेष स्थान देण्यात आले व व त्यांचा त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विद्यार्थिनी व महिला शिक्षकांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या फोटोचे पूजन व हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बालिका दिनाचे औचित साधून उपस्थित असलेल्या बालिकांचे स्वागत शाळेतील सन्माननीय शिक्षक श्री मानकर सर व कासदेकर सर यांनी केले. सावित्रीबाईंची वेशभूषा धारण केलेली राणी मानू धिकार हिचे स्वागत श्री वाढवे सर यांनी केले. अध्यक्ष प्रमुख अतिथी व उपस्थित महिला शिक्षक व पुरुष शिक्षकांचे स्वागत समारोह चा कार्यक्रम पार पाडला आला. यानंतर काही उपस्थित असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले अनमोल विचार मांडले.सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कुमारी निंगोट मॅडम व आखरे मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग दहावीचा विद्यार्थी कार्तिक भिमसा धुर्वे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी उन्नती सुनील उईके वर्ग दहावा हिने केले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वर्ग दहावी व वर्गशिक्षक सावरकर सर आणि वाढवे सर यांनी केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे