दिनांक 14 जानेवारी 2023 ला,समाज प्रबोधन गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सीमा पाटील मुंबईचे प्रख्यात गायक जॉली मोरे यांची उपस्थिती…
MB-NEWS (चांदुर रेल्वे) :-मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारी मुळे धार्मिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी असल्यामुळे कुठलेही कार्यक्रम घेता येत नव्हते. परंतु आता शासकीय बंदी हटविल्यामुळे अनेक प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने दरवर्षी विश्वरत्न आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार उत्सव समिती चांदुर रेल्वेच्या सौजन्याने समाज प्रबोधक गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे साठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सीमा पाटील तसेच मुंबईतील प्रख्यात गायक जॉली मोरे यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रदीप नानासाहेब डोंगरे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामविस्तार उत्सव समिती चांदुर रेल्वे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप हे राहणार आहेत.
चांदुर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सदर कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले दादासाहेब शिरसागर मानवी हक्क आयोग पी एस आय अनिल पवार पत्रकार कैलास मोरे माजी शिक्षण सभापती महमूद हुसेन अशोक मोहोंड, नितीन गवळी, राजीव अम्बापुरे, किशोर वाघ, महादेवराव दुर्योधन, विद्यासागर होले, सरिता सुनील राऊत, बाळासाहेब सोर्गिकर, रत्नकलाबाई खडसे, प्रकाश खरुले, कमल पणपालिया देविदास राऊत, सुरेश मेश्राम, मीना आठवले, युसूफ खान पठाण, डॉक्टर वाघाये, अब्दुल रहीम शेख दादू, सुभाष महाराज चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सदर सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब डोंगरे निरंजन गोसावी विलास डोळस, अशोक बनसोड, बबन मोहोड, प्रकाश रंगारी, उमेश गोंडाने, पंडित गवई, राजू गजभिये, दीपक खोब्रागडे, अशोक मोटघरे,वामनराव मेश्राम, बालकदास लोखंडे, उत्तमराव वासनिक, प्रा. सुधीर तायडे, नारायण सोनवणे, लता बागडे , रोशन गडलिंग, अशोक नंदेश्वर यांनी केले आहे

