तिवसा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने ‘पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आले, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तथा कर्मचारी यांचे सन्मान सत्कार करण्यात आले.
MB-NEWS तिवसा (ता.प्र.सुनिल घोडमारे) आज दि.१५जानेवारी रोजी रविवार ला आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’या मराठी वृत्तपत्राचे जनक यांच्या ६जानेवारी जयंती तसेच १९३२मध्ये सुरू केलेल्या मराठी वृत्तपत्रामुळे हा दिवस दर्णन दिन म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण देखील केले जाते.या अनुषंगाने तिवसा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने दि.१५जानेवारी २०२३ला या कार्यक्रमाला सुरुवात वेळ १२.००वा. तिवसा येथील या.द.व.देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे करण्यात आले.या कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शन मा.श्री. अविनाशजी दुधे ,(संपादक मिडीया वाँच )उपस्थित होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. संजयजी शेंडे,न्युज १८लोकमत ,यांची उपस्थिती होती. व विशेष अतिथी ः श्री. वैभव वानखेडे, माजी नगराध्यक्ष तिवसा, सौ.प्रियाताई नरेंद्र विघ्ने नगराध्यक्ष न.पं.तिवसा ,श्री. दिलीपराव काळबांडे माजी समाजकल्याण सभापती, श्री. रविदादा मानव, श्री. जसबीरभाऊ ठाकुर, अँड.श्री. तरकाने श्री. रवींद्रजी पाटील सर, या.द.व.देशमुख महाविद्यालयात तिवसा , सुत्र संचालन कर्ता ः गौरवभाऊ उके तसेच सत्कार मुर्ती उपस्थिती ः श्री. वैभव फरतारे तहसीलदार तिवसा ,डॉ. श्री. परिक्षीत कातखेडे सर ,पशुधन अधिकारी तिवसा, श्री. स्वप्निल उमप ,टि.व्ही.९मराठी,अमरावती श्री.सुरज दहाट ,लोकशाही न्युज अमरावती, यांचे या कार्यमात सन्मान सत्कार करण्यात आले. साफसफाई कामगार तिवसा यांचे सुद्धा सत्कार तिवसा मराठी पत्रकार यांचे कडुन करण्यात आले. या मराठी पत्रकार दिना निमित्त मार्गदर्शन श्री.अविनाश दुधे यांनी आपल्या व्याख्यानामधून पत्रकार बांधवाना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन पत्रकार यांनी पत्रकारिता कशी व कोणत्याही प्रकारात करावी यांचे मार्गदर्शन दिले व येणाऱ्या काळात पत्रकारी बदल घडवून येईल असे आपल्याला मनोगतामधुन पत्रकारांना सांगितले. सर्व पत्रकारांचे कौतुक केले.तसेच प्रमुख अथिती श्री. संजय शेंडे सर.न्युज १८ लोकमत ,यांनी आपले दोन शब्दातुन म्हटले कि पत्रकार हा देशातील चौथ्था आधारस्तंभ आहे.सामाजिक क्षेत्रातील लहान मोठ्या घटना,आपल्या लेखणीतुन प्रशिधिस आणारे पत्रकार बांधवाना किती अडचणी, व काही प्रकारच्या त्रास लेखणी करतांना होतो.तरीपण समाजात काही बदल किंवा काही गोष्टी निदर्शनास आणायचे कार्य पत्रकारच करीत आहे.

त्यांनी पत्रकारांच्या लेखणीचे कौतुक केले.श्री. वैभव फरतारे तहसीलदार यांनी पत्रकार दिन कार्यक्रमात खुप चांगले व्याख्यान म्हटले ,नेहमी चांगले कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांना मान सन्मान दिले. व पत्रकार करण्यास उत्साहीत केले. श्री. वैभव वानखडे माजी नगराध्यक्ष तिवसा यांनी मराठी पत्रकार संघटनेच्या पत्रकार बांधवाना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.कि येणाऱ्या काही काळात तिवसा येथे पत्रकार कार्यालय बनविण्यासाठी पत्रकार मदत देणार असे पत्रकारांना सांगितले.
विनीतः तिवसा तालुका मराठी संघटनेचे पत्रकार ः श्री. हेमंतभाऊ निखाडे, श्री. संदिपभाऊ राऊत,श्री. प्रशिक मकेश्वर,श्री. राजभाऊ माहोरे,श्री. जयंतभाऊ निखाडे, श्री. नंदकिशोर आकोटकर, श्री. विजय भाऊ क्षिरसागर, श्री. राहुल येरणे, श्री. अतुल भाऊ खुळे,श्री. नंदकिशोर मते,श्री. अंकुश बोके,श्री. तुषार भाऊ राऊतकर,श्री. सुयोग बानाईत, श्री. सौरभ कोहळे,श्री. प्रफुल्ल भाऊ मकेश्वर ,श्री. सुनिल भाऊ घोडमारे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

