जिल्हा परिषद शाळा जुनी भारवाडी येथे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न….
MB-NEWS :-(आशिष देशमुख प्रतिनिधी,गुरुकुंज मोझरी )
दिनांक १८, १९ जानेवारी ला जुनी भारवाडी जी प शाळेत दोन दिवसीय स्नेह संमेलन उत्साहात पार पडले यामधे सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य स्पर्धा एकांकिका , गायन इत्यादी मधे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एका पेक्षा एक सरस दर्जेदार सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले यामधे शेतकरी आत्महत्या करू नका या विषयावर आधारित चिमुकल्यांनी सादर केलेल्या स्कीट ने श्रोत्यांना भावूक केले गायन , वादन,नृत्य नाटिका आदी कलांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले दुसऱ्या दिवशी आनंद मेळावा घेण्यात आला यात वेग वेगळे पदार्थांचे स्टॉल लावत आनंद बाजारला उत्स्फूर्त प्रतिसाद गावकऱ्यांनी दिला एकंदरीत शिक्षणा सोबतच खेळी मेळीच्या वातावरणात स्नेह संमेलन पार पडले यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता गावकऱ्यांनी कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिलाया सर्व आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री संग्राम भुस्कटे सौ भुयार मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले गावातील शाळेत उत्तम उपक्रम नेहमीच राबिवात व सोबतच शाळेचा शैक्षणिक दर्जाही उंचावण्याचे काम शिक्षक वृंद करत आहे त्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती , ग्राम पंचायत व गावकऱ्यांकडून शाळेचे कौतुक केले…

