तिवसा तालुक्यातील सुरवाडी नजीक लघु कालव्याच्या मायनरचे पाणी शिरले वस्तीत.
:MB-NEWS तिवसा(सुनिल घोडमारे)-:तालुक्यातील ग्राम सुरवाडी येथून गेलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या लघु कालव्याच्या मायनार ओहरफ्लो होऊन थेट वस्तीत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याची घटना आज रविवारी घडली.नागरिकांना याचा कमालीचा त्रास सहन करावा लागला.आज २२ जानेवारी रोजी लघु कालव्याचा हा मायनार ओहरफ्लो झाल्याची घटना घडली.
शेती सिंचना साठी शेतकऱ्यांना कालव्याद्वारे पाणी पुरविण्या येत आहे.मात्र या पाणी वितरण प्रकिये कडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे असल्याने अनेक ठिकाणी मायनार हे ओहरफ्लो झाल्याने पाणी गावात शिरल्याने अनेक नागरिकांनी घरादारा पर्यंत गेल्याने जणू काही गावात पूर आला असे चित्र निर्माण झाले.यामुळे अनेक नागरिकाची चांगलीच तारांबळ उडाली .

