मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची सुरुवात गुरुकुंजातून साहित्यिकांच्या लेखणीतून शेतकऱ्यांच्या वेदना झळकल्या पाहिजे-विलास शिंदे…
MB-NEWS सुनिल घोडमारे (प्रतिनिधी):-बहुजन समाजाच्या साहित्य लेखणीतून शेतकऱ्यांच्या वेदना झळकायला लागल्यामुळेच शेती साहित्याचे प्रतिबिंब सर्वदूर पोहचले आहे. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणीवतेचे साहित्य जगापुढे येऊ लागले असून आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या घटकाला आता या साहित्यप्रेरनेमुळेच न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असा सूर शेती साहित्य या विषयांवर गुरुकुजात आयोजित केलेल्या तसेच सुसंस्कार स्मृती मंदिर येथे सम्पन्न झालेल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य समेलच्या पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटक विलास शिंदे यांनी व्यक्त केले. – यावेळी व्यासपीठावर डॉ, रवींद्र शोभने, जेष्ठ कादंबरीकार), पुष्पराज गावंडे, (वन्हाडी कादंबरीकार) अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामडळचे सरचिटणीस जनार्दनपंथ बोथे, कविता सानप, गंगाधर मुटे, आयोजक दिलीप भोयर, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते, सदर कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली, यावेळी मानवसेवा छात्रlलयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची क्रातीकारक भजने सादर केली, गुरुकुंजात आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्यातून तसेच अमरावती जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात शेतकरी तसेच साहित्यिक मोठ्या प्रमाणात या संमेलनात सहभागी झाले होते, यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, सदर आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा रीठे यांनी केले.

