जि. प. माध्यमिक शाळा व जि. प. प्राथमीक केंद्रीय शाळा काटकुंभ यांच्या संयुक्त विद्यमाने,शालेय स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा
MB-NEWS अक्षय अथोटे मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील २४ जानेवारी २०२३ रोजी जि. प. माध्यमिक शाळा व जि. प. प्राथमीक केंद्रीय शाळा काटकुंभ यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेले वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री. राजेशजी मालवीय उपाध्यक्ष मा. श्री. गणेशजी बडले व इतर सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जि. प. प्राथमिक केंद्रीय शाळा, काटकुंभ अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत नवनिर्वाचित सर्व सदस्य सरपंच कु. ललिता ताई बेटेकर उपसरपंच सौ वैशाली कमलेश राठोर उपस्थित होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमुख श्री अमोदे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जि प माध्यमिक शाळा काटकुंभ यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सलग तीन तास अतिशय शांततेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या नृत्य कला पाहण्यासाठी गावातील समस्त पालक वर्ग व गावकरी तसेच आजी-माजी विद्यार्थी कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी के.एम चांदुरे मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय श्री आर एस राऊत यांनी केले. आणि मुख्याध्यापक जि प माध्यमिक शाळा काटकुंभ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच आणि शिक्षक श्री.गोंडाणे सर श्री. एस.एस.पटोरकर. श्री.हेलोंडे आणि श्रीमती.येवले शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला गेला.

